वनिता खरातने केलेल्या जाहिरातीचा व्हिडीओ सोशल म...

वनिता खरातने केलेल्या जाहिरातीचा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल (Maharashtrachi Hasyajatra Fem Actress Vanita Kharat New Ad Video Goes Viral On Social Media)

‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ कार्यक्रमामुळे नावारुपाला आलेली अभिनेत्री वनिता खरातच्या लोकप्रियतेमध्ये आता प्रचंड वाढ झाली आहे. मराठीसह हिंदी चित्रपटामध्ये काम करत एक उत्तम अभिनेत्री म्हणून तिने स्वतःला सिद्ध केलं आहे. अभिनयामुळे चर्चेत असणारी वनिता आता जाहिरातही करते. तिने नुकतीच केलेली एक जाहिरात सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरत आहे. या जाहिरातीमध्ये वनिताने केलेलं काम विशेष लक्षवेधी ठरत आहे.

गौरव मोरे पाठोपाठ आता वनितालाही जाहिरातींच्या कामासाठी विचारणा होत आहे. तिने नुकतंच एका कोल्ड ड्रिंग ब्रँडसाठी जाहिरात केली. यामधील तिचा हटके अंदाज पाहून तिच्या चाहत्यांनाही हसू अनावर झालं आहे. शिवाय यामधील वनिताचा लूकही विशेष लक्षवेधी आहे.

लग्नाची पहिली रात्र आणि या सुंदर क्षणांसाठी नवरदेव करत असलेली तयारी या जाहिरातीमध्ये दिसत आहे. एवढ्यातच वनिता नटून-थटून रूममध्ये येते. आपल्या नवऱ्याच्या जवळ जाण्याचा प्रयत्न करते. नंतर प्रेमाने नवऱ्याला कोल्ड ड्रिंकची बॉटल पुढे करते. नवरा हे कोल्ड ड्रिंक पितो आणि बेडवर पडतो.

जाहिरातीची ही भन्नाट कल्पना, अन्‌ वनिताचा अभिनय याचं नेटकरी कौतुक करत आहेत. तुमच्या क्रिएटीव्हीटीला सलाम, वनिता खरात अगदी उत्तम, मस्त जाहिरात अशा कमेंट तिच्या चाहत्यांनी केल्या आहेत.