‘महाभारत’ मधील भीम – प्रवीण क...

‘महाभारत’ मधील भीम – प्रवीण कुमार यांचे निधन (Mahabharat’s ‘Bheem’ – Praveen Kumar Passes Away)

बी.आर.चोप्रा यांच्या ‘महाभारत’ या अतीव लोकप्रिय पौराणिक मालिकेत भीमाची भूमिका करून घराघरात पोहचलेल्या प्रवीण कुमार सोबती यांचे निधन झाले. ते ७४ वर्षांचे होते. ते दीर्घकाळापासून आजारी होते.

मूळचे पंजाब प्रांतातील प्रवीण कुमार यांनी ‘महाभारत’ नंतर बॉलिवूडच्या काही चित्रपटात अदाकारी निभावली. उंचापुरा आणि बलदंड शरीराच्या प्रवीण कुमार यांनी भीमाची भूमिका समरसून केली होती.

अभिनय क्षेत्रात येण्यापूर्वी प्रवीण कुमार स्पोर्टस मध्ये सक्रिय होते. हॅमर आणि डिस्क थ्रो यांचे ते खेळाडू होते. आशियाई खेळांमध्ये त्यांनी २ सुवर्ण, १ रौप्य आणि कांस्य पदक जिंकले होते. त्यांना अर्जुन पुरस्कार देखील लाभला होता नंतर त्यांना सीमा सुरक्षा दलात नोकरी मिळाली. तिथे काही काळ काम करून ते अभिनय क्षेत्रात आले.

आता अखेरच्या काळात प्रवीण कुमार यांची आर्थिक परिस्थिती खालावली होती. पंजाब सरकारने पेन्शन लागू केली नाही, याचा त्यांना रोष होता. गेल्याच वर्षी त्यांनी सांगितले होते की, तब्येत ठीक नसल्याने घरी पडून राहावे लागते. औषधांवर जगावे लागत आहे……