माधुरी दिक्षितचा मुलगा तरुण झाला; तिनं दिला इमो...

माधुरी दिक्षितचा मुलगा तरुण झाला; तिनं दिला इमोशनल मेसेज (Madhuri Dixit Wishes Son Arin On His 18th Birthday, Madhuri Shares An Emotional Post On His Birthday)

आज माधुरी दिक्षितचा मुलगा तरुण झाला. त्याचा १८वा वाढदिवस आहे. आनंदाच्या या प्रसंगी माधुरीने अरीनचे बालपणीचे व तरुणपणीचे फोटो, इन्स्टाग्रामवर शेअर केले अन्‌ एक भावुक संदेश टाकला. त्यावर तिचे चाहते भरपूर कमेन्टस्‌ करीत आहेत.

माधुरीने मोठा मुलगा अरीनला दिल्या शुभेच्छा!
मुलगा तरुण होणं, ही पालकांना खूप खास वाटणारी बाब आहे. आपल्या डोळ्यासमोर मुलाची वाढ होते, यात खूप सुख असतं. त्याप्रमाणे माधुरी खूप खुश आहे. या निमित्ताने लिहिलेल्या पोस्टमध्ये ती म्हणते – ”माझा मुलगा आता अधिकृतपणे वयस्क झाला. शुभेच्छा अरीन. तू आता स्वतंत्र झालास. पण त्याबरोबरच तुझी जबाबदारी पण वाढली आहे. आजपासून हे जग तुला आनंददायक आहे. सुरक्षित राहा आणि आपली चमक दाखव. इथून पुढे तू मिळेल त्या संधीचं सोनं कर आणि जीवनाचा आनंद घे. तुझा हा प्रवास संस्मरणीय होईल, अशी आशा आहे. लव्ह यू!”

अरीनचा जन्म १७ मार्च २००३ला झाला होता. तो अगदी त्याचे वडील डॉ. श्रीराम नेने यांच्यासारखा दिसतो. अरीन आणि रेयान या आपल्या दोन्ही मुलांचं पालनपोषण माधुरीने व्यवस्थित केले आहे. त्यासाठी ती दीर्घकाळ बॉलिवूडपासून लांब राहिली होती.

माधुरीने १७ ऑक्टोबर १९९९ रोजी लॉस एंजल्स्‌, कॅलिफोर्निया येथील हृदयविकार तज्ज्ञ डॉ. श्रीराम नेने यांच्याशी लग्न केलं होतं. लग्नानंतर ती बरीच वर्षे अमेरिकेत राहिली.

भारतात परतल्यावर तिनं पुन्हा कामास सुरुवात केली. ‘डान्स दिवाने’ सीझन ३ या कार्यक्रमाची परीक्षक म्हणून छोट्या पडद्यावर ती दिसते आहे.


‘मला खड्यासारखं बाजूला काढलं… १६ कोटींचं नुकसान झालं…’ हसरा गोविंदा सांगतोय्‌ आपली रडकथा!’