धकधक गर्ल आणि रितेश देशमुखचा ‘कच्चा बादाम’वर डा...

धकधक गर्ल आणि रितेश देशमुखचा ‘कच्चा बादाम’वर डान्स (Madhuri Dixit Shared A Video Of Her Dancing To The Song Kacha Badam With Riteish Deshmukh)

सध्या सोशल मीडियावर कच्चा बादाम हे गाणं प्रचंड गाजत आहे. पश्चिम बंगालमधील शेंगदाणा विक्रेता भुबन बड्याकरने गायलेल्या या गाण्याने लहान-थोरांना अक्षरशः काही दिवसांपासून वेड लावलं आहे. त्यानंतर त्या गाण्यावर अनेक व्हिडीओ व्हायरल झाले. सर्वसामान्यांपासून ते अगदी सेलिब्रिटींपर्यंत सगळेच या गाण्यावर थिरकताना दिसतात. पण यावेळी बॉलिवूडची धकधक गर्ल माधुरी दीक्षित आणि अभिनेता रितेश देशमुखचा या गाण्यावर डान्स करताना व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड वेगाने व्हायरल झाला आहे.

व्हायरल झालेला हा व्हिडीओ माधुरीने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून शेअर केला आहे. हा व्हिडीओ ‘द फेम गेम’ या चित्रपटाच्या सेटवरचा आहे. इथे रितेश आणि माधुरी डान्स करताना दिसत आहेत.

माधुरी दीक्षितने या व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये रितेशला विचारलं, ‘ हे जास्त मजेशीर नव्हतं का?’ रितेशनं नृत्यामध्ये साथ दिल्याबद्दल तिने त्याला धन्यवादही दिले आहे. यावर रितेशनं उत्तर दिलं आहे, ‘ खूप धमाल होती, माय प्लेझर, नेहमीच प्रेम.’

माधुरी दीक्षितने काही दिवसांपूर्वीच ओटीटीवर पदार्पण केलं आहे. ओटीटी वेब सीरिज द फेम गेममध्ये माधुरीनं बॉलिवूड सुपरस्टारची भूमिका केली आहे. या चमचमत्या दुनियेमागचं वास्तव किती भयानक आहे, हे यात दाखवलं आहे. लोकांना माधुरीचं काम आवडलं आहे. रितेश देशमुखही शूटिंगमध्ये व्यग्र आहे. सोनाक्षी सिन्हाबरोबर त्याचा काकुडा हा सिनेमा यावर्षी रिलीज होईल. तर पुढच्या वर्षी मिस्टर ममी हा सिनेमा आहे. मिस्टर ममीमध्ये त्याची पत्नी जेनेलिया देशमुखच आहे. खूप दिवसांनी दोघांची केमिस्ट्री पाहता येणार आहे.