‘मजा मा’ या प्राइम व्हिडिओच्या पहिल...

‘मजा मा’ या प्राइम व्हिडिओच्या पहिल्या चित्रपटात माधुरी दीक्षित झालीय मध्यमवर्गीय गृहिणी, मात्र ही भूमिका आहे गुंतागुंतीच्या व निर्भय अवताराची (Madhuri Dixit Plays A Role Of Middle Class Dashing Housewife In ‘Maja Ma’)

प्राइम व्हिडिओतर्फे त्यांच्या मजा मा या बहुप्रतिक्षित, पहिल्या भारतीय अॅमेझॉन ओरिजिनल चित्रपटाच्या ट्रेलरचे अनावरण करण्यात आले. या चित्रपटात बॉलिवूडची खरीखुरी राणी माधुरी दीक्षित एका गुंतागुंतीच्या आणि निर्भय अवतारात दिसणार आहे. तिच्यासह दिग्गज कलावंत व फिल्म इंडस्ट्रीतील काही नवोदित कलाकारांची तगडी फौज या कौटुंबिक मनोरंजन करणाऱ्या चित्रपटात आहे. यात गजराज राव, ऋत्विक भौमिक, बरखा सिंग, सृष्टी श्रीवास्तव, रजित कपूर, सिमोन सिंग, शीबा चड्ढा, मल्हार ठाकर व निनाद कामत यांचा समावेश आहे. प्रसन्न, हलकीफुलकी तरीही विचारांना चालना देणारी ही कथा या सर्वांनी मिळून जिवंत केली आहे. लिओ मीडिया कलेक्टिव व अमृतपाल सिंग बिंद्रा यांची निर्मिती, आनंद तिवारी यांचे दिग्दर्शन व सुमित बाठेजा यांचे लेखन असलेल्या ‘मजा मा चा प्रीमियर 6 ऑक्टोबरला भारतसह 240हून अधिक इतर देशांमध्ये केवळ प्राइम व्हिडिओवरून होणार आहे. खऱ्या अर्थाने बॉलिवूडचा मनोरंजक असलेला मजा मा हा चित्रपट पारंपरिक सण व एक जिवंत, रंगबिरंगी लग्नाच्या पार्श्वभूमीवर घडणारी कथा आहे. ही कथा प्रेक्षकांच्या हृदयाला स्पर्श करणारी आहे.  

नुकत्याच लाँच झालेल्या ट्रेलरमधून पल्लवीच्या (माधुरी दीक्षितने रंगवलेली व्यक्तिरेखा) आयुष्याची झलक दाखवण्यात आली आहे. पल्लवी ही तिच्या मध्यमवर्गीय घराचा व ती राहत असलेल्या सोसायटीचा कणा आहे, चित्रपटाची कथा तिच्याभवतीच फिरणारी आहे. जसजशी घटनांची मालिका उलगडू लागते, पल्लवीने प्रेमाने उभे केलेले सगळे काही कोसळायला लागते आणि त्यामुळे तिच्या मुलाचा होऊ घातलेला साखरपुडा धोक्यात येतो. या संघर्षात व्यक्तींच्या नात्यांमधील लवचिकता, समजुतदारपणा व विश्वास सगळ्याची कसोटी लागते. ही अभूतपूर्व परिस्थिती नेमकी काय आहे? पल्लवी व तिचे कुटुंब या संकटाचा सामना कसा करेल? या परिस्थितीत कुटुंबांमधील नाते अधिक घट्ट होईल की नवीन नाते मोडून पडेल? हे सगळे जाणून घेण्यासाठी, अनेक धक्के व वळणांनी भरलेला हा संपूर्णपणे मनोरंजक चित्रपट बघावा लागेल.

“प्राइम व्हिडिओच्या पहिल्या भारतीय अॅमेझॉन ओरिजिनल चित्रपटाचा भाग असणे माझ्यासाठी थक्क करणारा अनुभव आहे,” असे अभिनेत्री माधुरी दीक्षित म्हणाली. “मजा मा फिल्ममधील माझ्या व्यक्तिरेखेबद्दल मी सर्वांत जास्त उत्साहात आहे. मी पूर्वी कधीच साकारले नाहीत, असे पदर या भूमिकेला आहेत. पल्लवी पटेलच्या खांद्यावर खूप मोठी जबाबदारी आहे- एक आई म्हणून, एक पत्नी म्हणून, समाजाला योगदान देणारी सदस्य म्हणून आणि ती ही जबाबदारी अत्यंत सहजपणे व दिमाखात निभावते. त्यामुळे तिच्या कणखरपणाकडे, निष्ठेकडे आणि लवचिकतेकडे दुर्लक्ष करणे सोपे होते. ती अनेकविध भावनांमधून जाते, त्यांचे तिच्या व तिच्या जवळच्या लोकांच्या आयुष्यांवर ठळक परिणाम होऊ शकले असते.” तिने पुढे सांगितले, “मला माझे चाहते तसेच प्रेक्षकांपुढे ही फिल्म आणताना खूपच उत्साही वाटत आहे. या फिल्ममधील कलावंत व कर्मचाऱ्यांसोबत काम करणे हा सुंदर अनुभव होता. प्राइम व्हिडिओ मजा मा ही फिल्म जगभरातील प्रेक्षकांपर्यंत घेऊन जात आहे हे माझ्यासाठी थक्क करणारे आहे. हृदस्पर्थी कथनाच्या शोधात असलेल्या जगभरातील प्रेक्षकांना, आमच्या हृदयाचा, आमच्या कष्टाचा भाग असलेली ही फिल्म आवडेल.”

“मजा मामध्ये तुम्ही मला एका मध्यमवर्गीय व्यक्तीच्या, तरुण मुलांच्या वडिलांच्या आणि सुंदर पत्नीच्या पतीच्या भूमिकेत बघणार आहात,” असे गजराव राव मुव्ही व त्यांच्या व्यक्तिरेखेबाबत म्हणाले. 

तर “माझी भूमिका यात ममाज बॉयची आहे. आणि खुद्द माधुरी दीक्षित यांच्यासारखी देखणी व आकर्षक ममा असेल तर ते स्वाभाविकच आहे,” असे ऋत्विक भौमिकने सांगितले. 

“एशाची भूमिका करणे माझ्यासाठी रोमांचक अनुभव होता. माझ्या व्यक्तिरेखेत उत्तम समतोल आहे- जुन्या विचारांच्या एनआरआय आईवडिलांकडे वाढलेली असली तरी एशामध्ये आधुनिक अमेरिकी  स्वभाववैशिष्ट्ये आहेत आणि तरीही तिच्यात भारतीय संवेदनशीलताही आहे. ती एक स्वयंपूर्ण, आत्मविश्वास असलेली आणि मुक्त स्त्री आहे,” असे बरखा सिंग आपल्या भूमिकेबद्दल  म्हणाली.