माधुरी दीक्षितचा मराठमोळा साज लय भारी (Madhuri ...

माधुरी दीक्षितचा मराठमोळा साज लय भारी (Madhuri Dixit is the epitome of grace and elegance in Paithani)

मोरपंखी रंगाची पैठणी, नाकात नथ, गळ्यात नाजूक मोत्याचा हार, कपाळावर चंद्रकोर असा हा माधुरीचा मराठमोळा साज नेटकऱ्यांचं विशेष लक्ष वेधून घेत आहे. माधुरीने पन्नाशी उलटली असली तरी आजही तिचा अंदाज चाहत्यांना घायाळ करणारा आहे.

Madhuri Dixit, Paithani

नुकतच माधुरी दीक्षितने आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंट काही फोटो शेअर केले आहेत. हे तिचे नवे फोटोशूट असून, त्यामध्ये तिने धुपछाव मोरपंखी रंगाची भरजरी पैठणी परिधान केली आहे. ती नेहमीच आपली संस्कृती जपताना दिसते. त्यामुळे ती बरेचदा साडीत पाहायला मिळते. पण तिने वेस्टर्न आउटफिट परिधान केलेला असो किंवा ट्रेडिशनल, तिचं रूप आणि सुहास्य मोहिनी घालणारं आहे.

Madhuri Dixit, Paithani

माधुरी नेहमीच तिच्या वेगवेगळ्या फोटोशुटमुळे चर्चेत असते. माधुरीने आपल्या या नव्या फोटोशूटचे काही त्याचे फोटो सोशल मीडियावर पोस्ट केले आहेत. या फोटोंमधील तिचा मराठमोळा साज पाहून प्रेक्षकांच्या नजरा तिच्या सौंदर्यावर खिळल्या आहेत.

Madhuri Dixit, Paithani

पैठणी साडीतील माधुरीचा लूक लय भारी दिसतोय. सध्या माधुरी कलर्स टीव्हीवरील ‘डान्स दीवाने ३’ या कार्यक्रमात परिक्षक म्हणून काम करताना दिसत आहे.

(सर्व फोटो सौजन्य : माधुरी दीक्षित / इन्स्टाग्राम)