ब्लॉकबस्टर चित्रपट करुनही माधुरीचे मानधन सलमानप...

ब्लॉकबस्टर चित्रपट करुनही माधुरीचे मानधन सलमानपेक्षा कमीच, अभिनेत्रीने केला खुलासा (Madhuri Dixit Got Less Fees Than Salman Khan for This Blockbuster Film, Actress Revealed The Truth)

बॉलिवूडची धक धक गर्ल माधुरी दीक्षित आणि सलमान खान यांनी एकेकाळी मोठा पडदा गाजवला होता. या जोडीने अनेक हिट चित्रपट इंडस्ट्रीला दिले. हम आपके है कौन हा चित्रपट दोघांच्याही कारकिर्दीतील ब्लॉकबस्टर चित्रपट होता. आजही लोकांच्या मनातील या चित्रपटाची जादू कमी झालेली नाही. कधीही हा चित्रपट लागला तर चाहते तो अगदी आवडीने पाहतात. त्यावेळी या चित्रपटाने प्रदर्शित झाल्यावर बॉक्स ऑफिसवर बक्कळ कमाई केली. त्यामुळे त्यातील कलाकारांना सुद्धा त्याचा चांगला मोबदला मिळाला होता.

या चित्रपटासाठी माधुरीला सलमानपेक्षा जास्त मानधन मिळाल्याचे म्हटले जाते. माधुरीने स्वत: या गोष्टीचा खुलासा केला होता. अनुपम खेर यांच्या टॉक शोमध्ये माधुरीने सलमान खानने जास्त फी घेतल्याचे सांगितले होते. तो व्हिडिओ खूप व्हायरल झाला होता.

अनुपम खेरच्या टॉक शोमध्ये माधुरी पाहुणी म्हणून गेली असताना अनुपम यांनी तिला हम आपके है कौन चित्रपटात माधुरीने सलमानपेक्षा जास्त मानधन घेतले अशा अफवा होत्या ते खरं की खोटं असा प्रश्न विचारला. यावर तिने , जर असे बोलले जाते तर ठिक आहे बोलून दे. तिच्या या उत्तरावरुन तिला सलमानपेक्षा जास्त फी मिळाली नसल्याचे स्पष्ट होते.

सूरज बडजात्या हे या चित्रपटाचे दिग्दर्शक होते. या चित्रपटात सलमान आणि माधुरी व्यतिरिक्त रेणुका शहाणे, मोहनीश बहल, रीमा लागू, लक्ष्मीकांत बेर्डे, आलोक नाथ आणि अनुपम खेर हे कलाकार सहाय्यक भूमिकेत दिसले होते. 1994 मधला तो सगळ्यात ब्लॉकबस्टर चित्रपट होता.

फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम