माधुरीचा ‘घोडे पे सवार’ गाण्यावरील ...

माधुरीचा ‘घोडे पे सवार’ गाण्यावरील डान्स पाहून, नेटकरी उद्गारले,- ‘क्वीन ऑफ रील इज बॅक’ (Madhuri Dixit Dancing to Qala Song Ghodey Pe Sawaar Impresses Netizens)

बॉलिवूडची धक-धक गर्ल अर्थात माधुरी दीक्षितच्या डान्सची जादू आजही प्रेक्षकांवर कायम आहे. तिने बसल्या बसल्या डोळ्यांनी जरी भाव व्यक्त केले तरी सर्व तिच्या अदांवर फिदा होतात. हे माहीत असल्यानेच माधुरी सोशल मीडियावर काही ना काही पोस्ट करत असते, अन्‌ तिच्या चाहत्यांनाही खूप आवडते. आता माधुरीने तिचा एक व्हिडिओ शेअर केला आहे, ज्यामध्ये ती डान्स करताना दिसत आहे. अभिनेत्रीचा हा व्हिडिओ इंटरनेटवर व्हायरल झाला आहे, ज्यावर चाहते व्हिडिओला प्रचंड लाइक आणि कमेंट करत आहेत.

माधुरी दीक्षितने इन्स्टाग्राम अकाउंटवर तिचा एक व्हिडिओ शेअर केला आहे, ज्यामध्ये तिने आपल्या डान्सने चाहत्यांची मनं जिंकली आहेत. काही दिवसांपासून इंटरनेटवर प्रचंड प्रमाणात गाजत असलेल्या कला चित्रपटातील घोडे पे सवार या गाण्याने माधुरीलाही थिरकायला लावले आहे. व्हिडिओमध्ये माधुरी याच गाण्यावर डान्स करताना दिसत आहे. खरं तर चित्रपटात अनुष्का शर्मावर हे गाणे चित्रीत करण्यात आले आहे, मात्र आता चाहत्यांचे म्हणणे आहे की, अनुष्कापेक्षा माधुरीने चांगला डान्स केला आहे.

व्हिडिओमध्ये माधुरी दीक्षित ग्रीन एथनिक आउटफिटमध्ये दिसत आहे. तिने मॅचिंग कलरचे ब्रेसलेट परिधान केले आहे आणि तिचे केस मोकळे ठेवले आहेत. स्माईल आणि लिपसिंकसोबत, माधुरीने घोडे पे सावर या गाण्यावर उत्तम हावभाव करून नृत्य केले आहे. सिरीशा भागवतुलाने या गाण्याला आवाज दिला असून अमिताभ भट्टाचार्य यांनी ते लिहिले आहे, अशी माहिती आहे. संगीत अमित त्रिवेदी यांचे आहे.

डान्सचा व्हिडिओ शेअर करताना माधुरी दीक्षितने कॅप्शनमध्ये लिहिले की, ‘बलमा घोड़े पे क्यों सवार हैं?’ या व्हिडिओवर गायिका सिरिशा भागवतुलाने कमेंट केली, ‘ओह माय गॉड. द बेस्ट. याशिवाय एका यूजरने लिहिले की, ‘तुम्ही अनुष्का शर्मापेक्षा चांगला डान्स केला.’ ‘क्वीन ऑफ रील इज बॅक’ अशी टिप्पणी आणखी एकाने केली. आणखी एका युजरने लिहिले की, ‘तुम्ही या गाण्यासाठी बनलेले आहात’.

माधुरीच्या कामाबद्दल बोलायचे झाले तर, माधुरी दीक्षित मजा मा या चित्रपटात शेवटची दिसली होती, ज्यामध्ये तिने गजराज राव, ऋत्विक भौमिक आणि बरखा सिंह यांच्यासोबत स्क्रीन शेअर केली होती. हा चित्रपट गेल्या वर्षी अॅमेझॉन प्राइम व्हिडिओवर प्रदर्शित झाला होता.