नवरात्रात माधुरी दीक्षितने घेतले नवे घर : ४८ को...

नवरात्रात माधुरी दीक्षितने घेतले नवे घर : ४८ कोटी रुपयांचे घर ५३ व्या मजल्यावर आहे (Madhuri Dixit Buys New Luxury Apartment In Mumbai For Rs 48 Crore, Deets Inside)

नवरात्रीच्या दिवसात माधुरी दीक्षितने स्वतःचे घर घेतले. या नव्या घराची किंमत ४८ कोटी रुपये आहे. आतापर्यंत माधुरी आपल्या कुटुंबासह भाड्याच्या घरात राहत होती. आता तिने घेतलेले घर मुंबईच्या लोअर परळ या आलिशान वस्तीत असून तेथील एका उत्तुंग टॉवरमध्ये ५३ व्या मजल्यावर आहे. या घराची नोंदणी माधुरीने २८ सप्टेंबरला केली आहे.

माधुरीचे हे नवे अपार्टमेन्ट ५,३८४ चौरस फुटांचे असून तिला कार पार्किंगसाठी ७ गाळे मिळणार आहेत. या आधी ज्या भाड्याच्या घरात ती राहत होती, त्याचे दरमहा भाडे साडे बारा लाख रुपये होते.

या आधी माधुरीने वरळी भागात देखील एक प्रॉपर्टी इंडिया बुल्स कडून लिजवर घेतली आहे. ५,५०० चौरस फुटाचे हे घर २९ व्या मजल्यावर असून ते आलिशान आहे.

सध्या माधुरी ‘झलक दिखला जा’ या रिॲलिटी शो च्या १० व्या भागाची परीक्षक म्हणून काम बघते आहे. ‘मजा मा’ या आगामी चित्रपटामुळे पण ती सध्या चर्चेत आहे. आजकालच्या चित्रपटांबद्दल बोलताना टाइम्स समुहाला दिलेल्या मुलाखतीत माधुरीने असं वक्तव्य केलं होतं की, पूर्वी महिलाप्रधान चित्रपट फारच कमी बनत होते. आता स्त्री कलाकारांना देखील चांगले काम मिळत आहे. आत्ताचा काळ आणि वातावरण स्त्री कलाकारांना फारच पोषक आहे.