आर माधवनच्या मुलाने पोहण्याच्या स्पर्धेत प्रस्थ...

आर माधवनच्या मुलाने पोहण्याच्या स्पर्धेत प्रस्थापित केला राष्ट्रीय विक्रम : माधवन म्हणतो, – नाही कधी म्हणू नये (Madhavan’s son Vedaant breaks National Junior record, proud dad says ‘Never say never’)

अभिनेता आर माधवन सध्या त्याच्या ‘रॉकेट्रीः द नंबी इफेक्ट’ (Rocketry: The Nambi Effect) या चित्रपटामुळे चर्चेत आहे. त्याच्या चित्रपटाला उदंड प्रतिसाद मिळत आहे. माधवन या चित्रपटाला मिळत असलेल्या यशामुळे खूप आनंदी आहेच शिवाय आणखी एका कारणासाठी तो बेहद खूश आहे. त्याचा मुलगा वेदांत (Madhavan’s son Vedaant) याने पोहण्याच्या स्पर्धेत नवा विक्रम प्रस्थापित करून आपल्या वडिलांचा माधवनचा अभिमान वाढवला आहे. साहजिकच माधवन आपल्या मुलाच्या या यशाने खूप खूश आहे.

बॉलीवूडमधील इतर स्टार किड्स त्यांच्या ग्लॅमर आणि पार्ट्यांमुळे नेहमीच चर्चेत असतात, तर आर माधवनचा मुलगा वेदांत याने एका वेगळ्या क्षेत्रात आपले कर्तृत्व सिद्ध केले आहे. त्याने जलतरणात अनेक चॅम्पियनशिप्स जिंकून केवळ वडिलांनाच नाही तर देशालाही गौरविले आहे. आणि आता त्याच्या कर्तृत्वात आणखी एका कामगिरीची भर पडली आहे. आपल्या मुलाच्या या कामगिरीने माधवनचा आनंद गगनात मावेनासा झाला आहे.

देशासाठी जलतरणात अनेक पुरस्कार जिंकणाऱ्या वेदांतने आता राष्ट्रीय ज्युनियर विक्रम १५०० मीटर फ्रीस्टाइलचा विक्रम केला आहे. यात त्याने सुवर्णपदक जिंकले आहे. माधवनने स्वतः आपल्या मुलाच्या या कामगिरीबद्दल चाहत्यांना सांगितले आहे. आपल्या मुलाच्या या यशाने तो खूप खूश आहे. ही कामगिरी सोशल मीडियावर शेअर करून माधवनने आपल्या मुलाचे अभिनंदन केले आहे.

माधवनने वेदांतच्या जलतरण स्पर्धेचा एक व्हिडिओ देखील शेअर केला आहे. वेदांतने राष्ट्रीय ज्युनियर विक्रम १५०० मीटर फ्रीस्टाईलचा विक्रम आपल्या नावावर केला आहे. मुलाचा व्हिडिओ शेअर करत माधवनने कॅप्शनमध्ये लिहिले की, ‘कधीही नाही म्हणू नका. राष्ट्रीय ज्युनियर १५०० मीटर फ्रीस्टाइलचा त्याने विक्रम मोडला आहे. माधवनने आपल्या ट्विटमध्ये वेदांतला टॅग केले आहे.

मुलाच्या या यशाबद्दल चाहते माधवनचे अभिनंदन करत आहेत आणि तुझ्यासारखे आणखी पालक असायला हवेत, विशेषत: चित्रपटसृष्टीला, या शब्दात त्याचे कौतुकही करत आहेत. एका यूजरने म्हटले की, ‘ते पालक भाग्यवान आहेत, जे त्यांच्या मुलांमुळे ओळखले जातात. तुम्ही एक आदर्श पालक आहात.’

माधवन त्याच्या मुलाचा वेदांतचा स्विमिंग कोचही आहे. ‘साला खडूस’ चित्रपटात बॉक्सिंग कोचची भूमिका साकारत असताना आपल्या मुलाला प्रशिक्षण देण्याचा विचार त्याच्या मनात आला. अन्‌ मग आपल्या शेड्यूलमधून वेळ काढून माधवनने आपल्या मुलाला प्रशिक्षण देण्याचा निर्णय घेतला. त्यानंतरच त्यांच्या मुलाने राज्यस्तरावर अनेक जलतरण स्पर्धा जिंकून अनेक विक्रम आपल्या नावावर केले आहेत. याच वर्षी एप्रिलमध्ये वेदांतने एका स्पर्धेमध्ये सुवर्णपदक जिंकून वडिलांबरोबरच देशाचंही नाव मोठं केलं आहे. माधवनने याबाबतची पोस्ट सोशल मीडियावर पोस्ट केली आहे. अजूनही मोकळ्या वेळेत माधवन आपल्या मुलाला पोहण्याचे प्रशिक्षण देतो.