ब्लॅक शॉर्ट ट्यूब ड्रेस घालून मदालसा शर्माचा भन...

ब्लॅक शॉर्ट ट्यूब ड्रेस घालून मदालसा शर्माचा भन्नाट डान्स (Madalsa Sharma Did A Great Dance In A Black Short Tube Dress)

टेलिव्हिजनवरील लोकप्रिय मालिका ‘अनुपमा’ मधील काव्या हे पात्र साकारणारी अभिनेत्री मदालसा शर्माच्या (Madalsa Sharm) चाहत्यांची यादी भली मोठी आहे. त्यामुळे तिने पोस्ट केलेले फोटोज्‌ आणि व्हिडिओज्‌ लगेचच व्हायरल होतात. हल्लीच मदालसाने एक नवा व्हिडिओ इंस्टावर पोस्ट केला आहे, ज्यामध्ये ती अतिशय मादक आणि सुंदर दिसत आहे. चाहत्यांना तिचा हा व्हिडिओ खूपच आवडत आहे.

Madalsa Sharma
Madalsa Sharma

फोटो सौजन्य – इंस्टाग्राम

टी. व्ही वरील अभिनेत्री होण्याबरोबरच मदालसाची दाक्षिणात्य चित्रसृष्टीतील नटी म्हणूनही एक ओळख आहे. मदालसाने तिच्या डान्सचा एक व्हिडिओ इन्स्टावर पोस्ट केला आहे. त्यात तिने ब्लॅक कलरचा शॉर्ट ड्रेस घातला असून ती हवा में उडता जाएं… या गाण्यावर भन्नाट नाचली असल्याचे दिसत आहे. ब्लॅक कलरच्या या ड्रेसमध्ये ती फारच खुलून दिसत आहे. हा व्हिडिओ पोस्ट करत अभिनेत्रीने यलो हार्टसोबत ‘धिस सॉन्ग’ अशी कॅप्शन लिहिली आहे. या व्हिडिओला काहीच क्षणात २८ हजारपेक्षा अधिक चाहत्यांनी पसंती दर्शविली आहे.

Madalsa Sharma

नुसतीच पसंती नाही तर, ब्लॅक कलर तुला खूप सुंदर दिसतो. कवि, तू खूप क्यूट आहेस, ब्युटीफूल गर्ल अशाप्रकारच्या प्रतिक्रिया नेटकऱ्यांनी दिल्या आहेत. शिवाय काहींनी हार्टचे इमोजी टाकले आहेत.

Madalsa Sharma

फोटो सौजन्य – इंस्टाग्राम

Madalsa Sharma

मदालसा शर्माचे इन्स्टाग्रामवर १.३ मीलियन इतके फॉलोअर्स आहेत. तिच्या कामाबद्दल सांगायचं तर सध्या ती ‘अनुपमा’ या लोकप्रिय हिंदी मालिकेतील काव्याचे पात्र साकारत आहे. मदालसा ही बॉलिवूड इंडस्ट्रीचे दिग्गज अभिनेता मिथुन चक्रवर्ती यांची सून आहे. मदालसा ही सुपरिचित चित्रपट निर्माता आणि दिग्दर्शक सुभाष शर्मा यांची मुलगी असून तिची आईदेखील अभिनेत्री आहे. तिच्या आईने महाभारत मालिकेत देवकीची भूमिका केली आहे.

Madalsa Sharma
Madalsa Sharma

फोटो सौजन्य – इंस्टाग्राम

मदालसा शर्मा ही इंटरनॅशनल मॉडेल आहे. तिने अनेक फॅशन शोज मध्ये सहभाग दर्शविला आहे. तमिळ, तेलगू, कन्नड़, पंजाबी, जर्मन आणि हिंदी अशा अनेक भाषांमधील चित्रपटांत तिने काम केले आहे. गणेश आचार्य यांच्या २०११ साली आलेल्या ‘एंजेल’ या चित्रपटापासून तिने बॉलिवू्डमध्ये पदार्पण केलं आहे. मात्र सध्या काव्या हीच तिची ओळख बनली आहे.