करिश्मा कपूरचा मुलगा कियानच्या वाढदिवशी भावासोब...

करिश्मा कपूरचा मुलगा कियानच्या वाढदिवशी भावासोबत पिझ्झा पार्टी करताना तैमूर, करीना ने शेयर केला गोड फोटो! (Maasi Kareena Kapoor Wishes Karisma’s Son Kiaan On Birthday, Shares Adorable Picture Of Him Enjoying Pizza With Taimur)

तैमूरचा पिझ्झा पार्टी करतानाचा फोटो व्हायरल होत आहे. या फोटोमध्ये तैमूर त्याचा मोठा भाऊ आणि करिश्मा मावशीचा मुलगा कियानसोबत पिझ्झा खाताना दिसत आहे. आज कियानचा आठवा वाढदिवस आहे आणि हा दोघांचा फोटो करीनाने तिच्या इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे.

या फोटोमध्ये दोघे भाऊ कॅज्युअल लूक मध्ये आहेत. तैमूर नाइट सूटमध्ये आणि कियान टीशर्ट मध्ये आहे. दोघं बिछान्यावर बसून मस्त पिझ्झा पार्टी करत आहेत आणि तैमूर गोड हसत तोंडात बोट घालून बसलेला आहे.

करीनाने बर्थडे बॉयसाठी कॅप्शनमध्ये लिहिलंय – आम्ही असेच बेडवर बसून पिझ्झा खात असतो. भावा असा पिझ्झा खाण्यातली मज्जा औरच आहे. कियान आम्ही तुझ्यावर खूप प्रेम करतो. हॅपी बर्थडे डार्लिंग. सोबतच करीनाने अनेक हॅशटॅग टाकले आहेत – लोलोचा मुलगा, बर्थडे बॉय.

करीनाच्या या पोस्टवर करिश्माने प्रतिक्रिया देत म्हटलंय की, आम्ही देखील त्यांच्यासोबत पिझ्झा खाण्यात सामील होत असतो. या फोटोला मोठ्या प्रमाणात पसंती दर्शविली जात आहे. या फोटोत दोन भावांमधील बाँडिंग विशेषतः चाहत्यांना भावलं आहे. सर्वजण कियानला वाढदिवसाच्या शुभेच्छा देत आहेत आणि दोघांच्या क्युटनेसला पसंती दर्शवित आहेत

करिश्माने कियानचा छान फोटो तिच्या इन्स्टावर शेअर केला आहे आणि बर्थ डे पार्टीची एक झलक दाखविली आहे. या फोटोत माय-लेकामधील प्रेम आणि प्रेमळ बाँडिंग खूपच कौतुकास्पद आहे.  करिश्मा ने लिहिलंय – हॅप्पी बर्थडे टु माय बॉय!