बिग बॉसच्या मंचावर ‘लकडाऊन’ चित्रपटाचे पोस्टर प...
बिग बॉसच्या मंचावर ‘लकडाऊन’ चित्रपटाचे पोस्टर प्रदर्शित (‘Luckdown’ Flim’s Poster Released On The Platform Of Big Boss)

करोनाचे संकट मावळत असल्याचे दिसू लागताच चित्रपटगृहे सुरू झालीत. त्यामध्ये मराठी चित्रपट एकामागोमाग एक प्रदर्शित होऊ लागले आहेत. असाच एक बहुचर्चित मराठी चित्रपट ‘लकडाऊन’ लवकरच येईल. त्याच्या पोस्टरचे अनावरण बिग बॉसच्या मंचावर करण्यात आले. सूत्रसंचालक महेश मांजरेकर यांनी हे अनावरण केले व चित्रपटाच्या वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

अंकुश चौधरी व प्राजक्ता माळी ही जोडी ‘लकडाऊन’मध्ये चमकत आहे. विशेष म्हणजे या चित्रपटाचे संपूर्ण चित्रिकरण लॉकडाऊनच्या काळातच करण्यात आले आहे. त्यात पुन्हा हे चित्रण पूर्णतः छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जन्मभूमीत, किल्ले शिवनेरी परिसरात, जुन्नर गावी करण्यात आले आहे.

या कौटुंबिक चित्रपटाची निर्मिती शरद सोनवणे, दर्शन व सागर फुलपगार आणि अजित सोनपाटकी यांची असून दिग्दर्शक संतोष मांजरेकर यांनी केलं आहे. लेखक रविंद्र मठाधिकारी असून संगीत अविनाश-विश्वजीत यांनी दिलं आहे.