शमिता शेट्टी आणि राकेश बापट यांचा ब्रेकअप? शमित...

शमिता शेट्टी आणि राकेश बापट यांचा ब्रेकअप? शमिता शेट्टीने केला खुलासा… (Lovebirds Shamita Shetty & Raqesh Bapat Break-up, Shamita Reacts On Break-up News)

गेल्या अनेक दिवसांपासून चर्चेत असलेले लव्हबर्ड शमिता शेट्टी आणि राकेश बापट यांच्या नात्याबद्दल सध्या वेगळ्याच चर्चा सुरू आहेत. या दोघांमध्ये सर्व काही आलबेल नसून यांचं नातं आता ब्रेकअपच्या उंबरठ्यावर उभं असल्याच्या चर्चांना उधाण आलं आहे. शमिता आणि राकेश यांचं ब्रेकअप झाल्याचं म्हटलं जात आहे. त्यामुळं या दोघांच्या चाहत्यांना धक्का बसला आहे.

मागील काही दिवसांत दोघांचे एकत्रित असे रोमँटिक फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. हे दोघेजण एका दागिन्यांच्या दुकानाबाहेर दिसले. त्यावेळी दोघांनीही एकाच रंगाचे कपडे घातले होते. फोटोग्राफर्सना पाहून त्यांनी एकमेकांच्या हातात हात घेत फोटोंसाठी रोमँटिक पोझही दिल्या. इतकंच नाही तर राकेश शमिताच्या कुटुंबियांसोबत अनेकदा दिसला आहे. त्यामुळे त्यांच्या ब्रेकअपची बातमी आल्यानं पुन्हा एकदा चर्चा रंगल्या आहेत.

पिंकविला या वेबसाइटला राकेशच्या एक जवळच्या व्यक्तीनं शमिता आणि राकेश यांच्या नात्याबद्दल सांगितलं आहे. शमिता आणि राकेश यांच्यात काही गोष्टींमुळं मतभेद होते. त्यामुळं त्यांनी नातं संपवण्याचा निर्णय घेतला, असं सांगितलं आहे. परंतु, राकेशने याबाबत काहीही खुलासा दिला नसून शमिताने मात्र या ब्रेकअपच्या बातम्या खऱ्या नसून अफवा असल्याचं म्हटलं आहे. यावर विश्वास ठेवू नका, असंही तिने म्हटले आहे.

राकेश बापट आणि शमिता शेट्टीच्या प्रेमकथेला बिग बॉस ओटीटी कार्यक्रमातून सुरुवात झाली. राकेशनं या कार्यक्रमात शमिताला प्रमोज केलं होतं. त्यानंतर हे दोघेजण सलमान खानच्या बिग बॉस १५ मध्येही स्पर्धक म्हणून सहभागी झाले होते. परंतु राकेश बापटला किडनी स्टोनचा त्रास होऊ लागल्यानं त्याने कार्यक्रमातून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला. तर शमिता शेट्टीला या स्पर्धेत तिसऱ्या क्रमांकावर समाधान मानावं लागलं होतं