हृदयात वाजे समथिंग…. (Love Day Celebratio...

हृदयात वाजे समथिंग…. (Love Day Celebrations Over The World)

‘हृदयात वाजे समथिंग… सारे जग वाटे हॅपनिंग…’ असं वाटू लागलं की समजायचं की व्हॅलेंटाईन डेचे वारे वाहू लागले आहेत. कारण प्रेमाची व्याख्या समजणार्‍या प्रत्येकाला व्हॅलेंटाईन डेचे महत्त्व माहितीय.
फेब्रुवारी हा प्रेमाचा महिना. या महिन्यात खास तरुणाईकडून उत्साहात साजरा केला जाणार दिवस म्हणजे व्हॅलेंटाईन डे. अर्थात या दिवसाबद्दल वेगळी माहिती देण्याची गरज नाही. ‘हृदयात वाजे समथिंग… सारे जग वाटे हॅपनिंग…’ असं वाटू लागलं की समजायचं की व्हॅलेंटाईन डेचे वारे वाहू लागले आहेत. कारण प्रेमाची व्याख्या समजणार्‍या प्रत्येकाला व्हॅलेंटाईन डेचे महत्त्व माहितीय. हा दिवस 14 फेब्रुवारीला साजरा करतात. मात्र त्याच्या एक आठवड्याआधीच व्हॅलेंटाईन वीक साजरा केला जातो.
14 तारखेच्या बरोबर 7 दिवस आधी म्हणजे 7 फेब्रुवारीला हा व्हॅलेंटाईन वीक सुरू होतो. यामध्ये रोज डे, चॉकलेट डे या सर्व डेजचा समावेश असतो.

7 फेब्रुवारी-रोज डे

व्हॅलेंटाईन वीकची सुरुवात रोज डेने होते. गुलाब हे प्रेमाचं प्रतीक असल्याने यादिवशी मित्र मैत्रीण किंवा जवळची एखादी व्यक्ती एकमेंकाना गुलाबाचं फुल देतात. कॉलेजमध्ये तरुणाईकडून हा दिवस मोठ्या उत्साहात साजरा केला जातो.

8 फेब्रुवारी-प्रप्रोज डे

अर्थात एकमेकांवरील प्रेम व्यक्त करण्याचा दिवस म्हणजे प्रप्रोज डे. एखाद्या व्यक्तीबद्दल आपल्या मानत असणार्‍या भावना व्यक्त करण्याचा हा दिवस असतो.

9 फेब्रुवारी-चॉकलेट डे

प्रेम व्यक्त झाल्यानंतर भेट दिली जाते. आणि चॉकलेट हे ऑल टाईम फेव्हरेट असलेलं आणि लहानांपासून मोठ्यांपर्यंत प्रत्येकाच्या चेहर्‍यावर हसू आणणारं गिफ्ट आहे. त्यामुळे या दिवशी मित्र-मैत्रीण व आपल्या प्रिय व्यक्तीला भेटवस्तू म्हणून चॉकलेट्स दिली जातात.

10 फेब्रुवारी-टेडी डे

आपल्याला आवडणार्‍या मुलीला यादिवशी भेटवस्तू म्हणून टेडी दिले जाते. मुलींना स्फॉट असे हे बाहुले प्रचंड आवडतात. त्यामुळे टेडी डेला खास व्यक्तीकडून त्यांना हे गिफ्ट मिळते.

11 फेब्रुवारी-प्रॉमिस डे

कोणत्याही नात्याचा पाया हा विश्वासावर अवलंबून असतो. त्यामुळे नात्यात आणखी विश्वासाहर्ता निर्माण करण्यासाठी प्रॉमिस डे साजरा केला जातो. यादिवशी एकमेकांसोबत कायम राहण्याचे एकमेकांना वचन दिले जाते.

12 फेब्रुवारी-हग डे

प्यार की छप्पी… मिठी. शब्द उच्चारला तरी कृतीचा भास होतो. या दिवशी आपल्या जवळच्या व्यक्ती व मित्र-मैत्रिणींशी गळाभेट केली जाते. केवळ मित्र मैत्रिणच नव्हे तर घरातील सदस्यांसहदेखील हग डे साजरा केला जातो.

13 फेब्रुवारी-किस डे

आपल्याला प्रिय असलेल्या व्यक्तीचे चुंबन घेऊन मनातील भावना व्यक्त करण्याचा हा दिवस. चुंबनाने प्रेम अधिक वाढते.

14 फेब्रुवारी-व्हॅलेंटाईन डे

संपूर्ण प्रेमाच्या आठवड्यानंतर अखेर व्हॅलेंटाईन डे साजरा केला जातो. यावेळी प्रत्येकजण आपल्या जवळच्या खास व्यक्तीसोबत असणे पसंत करतात. प्रियकर-प्रेयसी एकमेकांना खुश करण्यासाठी वेगवेगळ्या युक्त्या आखत असतात. विविध गिफ्ट्स दिले जातात. गुलाबाची फुले, प्रेम व्यक्त करणारी भेटकार्डे दिली जातात. भारतामध्ये साधारणपणे असाच व्हॅलेंटाईन साजरा करतात. प्रेम तुमचं आमचं सेम असलं तरी ते व्यक्त करण्याचा हा दिवस जगभरात वेगवेगळ्या पद्धतीनं साजरा केला जातो.

– साऊथ कोरियामध्ये सिंगल व्यक्तीही हा दिवस साजरा करू शकतात. सिंगल लोक म्हणजे प्रेमाच्या शोधात असलेले लोक 14 फेब्रुवारी रोजी आपल्या आवडत्या व्यक्तीला प्रपोज करतात.
– जपानमध्ये व्हॅलेंटाईन डे दिवशी मुली सर्वांना चॉकलेटस् वाटतात. सहकारी, कर्मचारी, मित्रपरिवार अशा सर्वांना मगिरी चोकोफ हे चॉकलेट दिलं जातं. पण आपल्या खास मित्राला किंवा प्रियकराला महोन्मेई चोकोफ हे चॉकलेट देऊन प्रेम व्यक्त केलं जातं.
– युरोपिअन देशात व्हॅलेंटाईन डेला मफ्रेंड्स डेफ साजरा केला जातो. या दिवशी आपल्या मित्रांसोबत वेळ घालवला जातो. आणि जे सिंगल आहेत त्यांच्यासाठी मलव्ह बसफ देशभर फिरतात. या बसमध्ये अनेक सिंगल्स आपलं प्रेम शोधण्यासाठी येत असतात.
– तैवानमध्ये 14 फेब्रुवारीप्रमाणेचच 7 जुलै रोजीही व्हॅलेंटाईन डे साजरा केला जातो. आपल्या प्रियकर किंवा प्रेयसीचं किती प्रेम आहे हे या दिवशी देण्यात येणार्‍या फुलांवर ठरतं. म्हणजेच 99 गुलाबांची फुलं दिली तर त्याचं प्रेम आयुष्यभर राहणार आणि लग्नाची मागणी घालण्यासाठी येथील प्रियकर 108 फुलांची भेट प्रेयसीला देतात.
– फिलिपाईन्समधील व्हॅलेंटाईन डे दिवशी लग्नाला इच्छुक असणारे वधू-वर एकत्र येतात आणि सामूहिक विवाह केला जातो.
– चीनमध्ये ऑगस्ट महिन्यात व्हॅलेंटाईन डे साजरा केला जातो. हा दिवस म्हणजेच त्यांच्यासाठी मक्वीझी महोत्सव’ असतो. चीनमध्ये यादिवशी लग्नकार्ये केली जातात. प्रेमाच्या दिवशीच लग्न केल्याने संसार सुखाचा होतो असा येथील लोकांचा समज आहे.

हे आपण काही देशातील पाहिलं पण हा प्रेमाचा दिवस अतिशय प्रेमाने आणि आनंदाने सर्वत्र साजरा होतो. तरुणाईचा उत्साह तर अगदी ओसंडून वाहत असतो. आपल्या आवडत्या व्यक्तीबरोबर व्हॅलेंटाइनच्या आधीचा वीकएण्ड घालवण्याचं ठरवलं तर त्याची तयारी कशी करायची? रोमँटीक डेसाठी मेकअप कसा करायचा? काय ड्रेस करायचा? आपल्या प्रेमाच्या माणसासाठी काय गिफ्ट घ्यायचं? यासाठी फेब्रुवारी महिन्याच्या सुरुवातीपासूनच तयारी सुरू होते. बाजारातही सर्व मॉल्स, दुकानं प्रेमाच्या अर्थात लाल रंगात रंगून गेलेली दिसतात. प्रेमाचं भेटकार्ड, प्रेमाचं फुल, प्रेमाचा मेकअप, प्रेमाची भेट… असं हे प्रेमाच्या दिवसाचं सेलिब्रेशन!