काही मिनिटातच सडपातळ दिसण्यासाठी 6 सोपे उपाय(Lo...

काही मिनिटातच सडपातळ दिसण्यासाठी 6 सोपे उपाय(Look Slim In Just Few Minutes)

एका दिवसात वजन घटवणे शक्य नाही, परंतु आपल्या दिसण्यामध्ये थोडा बदल करून आपण आपलं वाढलेलं वजन अवश्य लपवू शकतो. अगदी काही मिनिटात तुम्ही सडपातळ दिसू शकता. कसे? चला तर आम्ही तुम्हाला सांगतो…
1. सडपातळ दिसण्यासाठी असे कपडे घाला
काही मिनिटांत सडपातळ दिसण्यासाठीची सुरुवात वॉर्डरोबपासून करा. तुमच्या वॉर्डरोबमध्ये असे आऊटफिट ठेवा जे तुम्हाला सडपातळ लूक देतील. उदाहरणार्थ – ब्लॅक, नेव्ही ब्लू इत्यादी डीप कलरचे प्लेन आऊटफिट. सोबत शेपवेअरचा वापर केला तर तुम्ही काही मिनिटांत स्लिम लूक मिळवू शकता. म्हणून वॉर्डरोबमध्ये शेपवेअर्सचा समावेश जरूर करा. तुमची अपर बॉडी हेवी असली तर गडद शेडचा व्ही नेक लाईनवाला टॉप घाला आणि जर लोवर बॉडी हेवी आहे तर डार्क कलरची जीन्स, स्कर्ट आदी घाला.

2. सडपातळ दिसण्यासाठी अशी केशरचना ठेवा
हेअरकटमुळे देखील तुम्ही सडपातळ दिसू शकता, हे तुम्हाला माहीत आहे का? हो, फेस कट लक्षात घेऊन हेअर कट केला तर हा नवीन हेअरकट तुम्हाला सडपातळ लूक देऊ शकतो. सडपातळ आणि तरुण दिसायचं असेल तर कर्ल्स वा वेवी हेअर कट करण्याचा विचारही करू नका. हेअर कट ऐवजी केसांचे स्ट्रेटनिंग करून घ्या. स्ट्रेटनिंगमुळे चेहरा लहान दिसतो.

3. सडपातळ दिसण्यासाठी असा करा मेकअप
काही मिनिटांत सडपातळ दिसण्यात मेकअप किटही उपयुक्त ठरतो. मेकअपच्या वेगवेगळ्या शेडस्, तसेच मेकअप ब्रशने आयडियल फेस कट करुन देखील तुम्ही आपला चेहरा लहान भासवू शकता. तुमचा चेहरा गोल किंवा चौकोनी आहे; तर मेकअप ब्रशच्या मदतीने तुम्ही त्यास लाँग किंवा ओवल शेप देऊ शकता. म्हणजेच मेकअप करण्याच्या युक्त्या शिकून तुम्ही सडपातळ दिसू शकता. तरुण आणि सडपातळ दिसण्यासाठी मेकअप एक्सपर्टकडून योग्य मेकअप युक्त्या शिकून घ्या.

4. सडपातळ दिसण्यासाठी असे फुटवेअर घाला
तुमचं व्यक्तीमत्त्व आकर्षक आणि रुबाबदार दिसावं यासाठी उंच टाचा तुमच्या कामी येतील. उंच टाचांची चप्पल वापरून तुम्ही काही वेळ सडपातळ आणि आकर्षकही दिसाल. सडपातळ दिसण्यासाठी वेज वा प्लॅटफॉर्म हील ऐवजी पेन्सिल हिल घाला.

5. सडपातळ दिसण्यासाठी असे घाला दागिने
सडपातळ दिसण्यासाठी हेवी वा जड दागिने घालण्याची आवड विसरावी लागेल. याऐवजी वजनाने हलकी आणि सिंगल लेअरच्या दागिन्याची निवड करा. हेवी किंवा मल्टी लेअर्ड दागिने घालून तुम्ही अजून जाड दिसू शकता. सडपातळ दिसण्यासाठी कमीत कमी ज्वेलरी घाला, साध्या इअररिंग वा स्लीक नेकपीस घालू शकता.

6. सडपातळ दिसण्यासाठी स्मार्ट टिप्स
एखाद्या समारंभासाठी वा खास प्रसंगी तुम्हाला वन पीस ड्रेस घालायचा आहे, तर डबल वा मल्टी कलरचा वन पीस ड्रेस घालू नका, सिंगल कलर (डार्क शेड) चा वन पीस ड्रेस घालून जा. यामुळे तुमचं बेडौल शरीर सहजपणे लपलं जाईल. स्थूल महिलांनी ब्लॅक, डार्क ब्लू सारख्या गडद रंगांना आपलं स्टाईल स्टेटमेंट बनवावं. या महिलांनी समारंभ वा खास प्रसंगासाठी बाहेर जाताना नेकपीस, इयररिंग, बॅग यांची निवड करताना ती सुंदर करावी. यामुळे कोणाचंही तुमच्या स्थूलपणावर लक्ष कमी आणि तुमच्या सौंदर्यप्रसाधनांवर लक्ष जास्त जावं. या युक्त्या नक्की उपयोगात आणून पाहा. तुम्ही सगळ्यांकडून प्रशंसा मिळवाल.