वाढदिवसाच्या दिवशी आईच्या आठवणीत अर्जुन कपूर झा...

वाढदिवसाच्या दिवशी आईच्या आठवणीत अर्जुन कपूर झाला भावूक.. (‘Look Maa Your Son Is 37 Today & All Grown Up…’ Arjun Kapoor Misses Late Mom Mona Kapoor On His Birthday, Pens An Emotional Note)

अर्जुन कपूरने २६ जूनला त्याचा ३७ वा वाढदिवस साजरा केला. वाढदिवस साजरा करण्यासाठी तो  त्याची प्रेयसी मलायका अरोरासोबत पॅरिसला गेला आहे.  सध्या दोघांचे रोमॅंण्टिक फोटो आणि व्हिडिओ खूप व्हायरल होत आहेत. त्यांच्या चाहत्यांनासुद्धा त्यांचे फोटो खूप आवडले आहेत. तर काहींनी त्यांच्या फोटोला  ट्रोल देखील केले आहे.  पण या सर्व गोष्टींकडे लक्ष न देता अर्जुनने असा एक फोटो शेअर केला आहे जे पाहून आणि वाचून कोणीही भावूक झाल्याशिवाय राहू शकत  नाही. तसेच त्यामुळे त्याचे कौतुक सुद्धा होत आहे.

अर्जुनने पॅरिसमधील एक फोटो शेअर केला आहे. ज्यामध्ये तो आकाशाकडे पाहत आहे स्वत:च्याच विचारात हरवला आहे.  अर्जुनने या फोटोसह आपल्या आईची आठवण काढून अतिशय भावनिक पोस्ट लिहिली आहे. अर्जुनने पोस्टमध्ये लिहिले की, बघ आई, तुझा मुलगा आज ३७ वर्षांचा झाला आहे. बघ तो किती मोठा झाला आहे.  मला तुझी खूप आठवण येते आणि मला माहित आहे की तू नेहमी माझ्याकडे पाहत असतेस. अर्जुनने त्याच्या पुढे हृदयाचा इमोजीही पोस्ट केला आहे.

अर्जुनच्या या पोस्टवर त्याचे चाहते, सेलिब्रेटी आणि त्याचे मित्रही भावूक झालेत. अनेकांनी तुझ्या आईला आज तुझा खूप अभिमान वाटेल  असे म्हणत त्याला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

या फोटोत अर्जुनने पांढरा शर्ट आणि काळी पॅन्ट घातलेली दिसते.  काळ्या शूज आणि ग्लेअर्समध्ये तो खूप स्मार्ट दिसत आहे.

सध्या  अर्जुन त्याची प्रेयसी मलायकासोबत खूप एन्जॉय करत आहे. दोघांनी  मिळून  वाढदिवस मोठ्या थाटामाटात साजरा केला. व्हायरल होणाऱ्या व्हिडिओत दोघेही  एकमेकांना हाताने भरवताना दिसत आहेत.  फोटोत दोघांनी एकमेकांसारखे  मॅचिंग कपडे घातलेले दिसतात.

अर्जुन आणि मलायका दोघे त्यांच्या इन्स्टाग्रामवर  सहलीचे आणि वाढदिवसाच्या सेलिब्रेशनचे फोटो आणि व्हिडिओ पोस्ट करत आहेत, फोटोत दोघेही खूप आनंदी दिसत आहेत. अर्जुनच्या पुढील कामाबद्दल बोलायचे झाल्यास तो एक व्हिलन रिटर्न्समध्ये दिसणार आहे.