हिना खान, करिश्मा तन्ना व इतर टी. व्ही. स्टार्स...
हिना खान, करिश्मा तन्ना व इतर टी. व्ही. स्टार्सकडून शिकण्याजोगी मास्कची फॅशन (Look Fashionable In A Mask; Take Inspiration From These Actress Including Hina Khan, Karisma Tanna)


करोनाच्या या वाईट काळात, त्यापासून बचाव करणारा मास्क लावणे, अति आवश्यक झाले आहे. आता मास्क ही गरजेची वस्तू झाल्याने त्याचीही स्टाईल दिसू लागली आहे. तेव्हा मास्क घालून फॅशनेबल व स्टाईलिश बनायचे असेल तर या टी. व्ही. कलावतींकडून त्याचे धडे घ्या.
हिना खान

टी. व्ही. कलाकार हिना खान स्टाईल मारण्यात बॉलिवूड अभिनेत्रींपेक्षा कमी नाहिये. या फोटोमध्ये हिनाने ऑरेंज शर्ट आणि ब्लॅक जिन्सवर स्टाईलिश ब्लॅक मास्क घातला आहे. जो तिच्या पेहरावाला शोभून दिसतो आहे. सोबत तिने बकेट हॅट घातली आहे, जी तिला स्टाईलिश लूक देते आहे.
करिश्मा तन्ना


टी. व्ही. कलावती करिश्मा तन्ना कडून तुम्ही मास्क घालण्याच्या क्रिएटिव्ह टिप्स घेऊ शकता. या फोटोमध्ये बघा, तिने आय कॅट सनग्लासेस घालून, चेनयुक्त स्टाईलिश मास्क चढवला आहे. या चेनमुळे तुमचा चांगला मास्क हरविण्याचा धोका राहणार नाही. दुसऱ्या फोटोत करिश्माने कुर्तीला मॅच करणारा मास्क घातला आहे. तो अतिशय स्टाईलिश दिसतो आहे.
शहनाज गिल

शहनाज गिल देखील चांगलीच फॅशनेबल व स्टाईलिश आहे. तिचं प्रत्येक लूक जणू फॅशन स्टेटमेन्ट असतं. हा फोटो तिचा विमानतळावरचा आहे. यात तिने पांढरा मास्क घातला आहे. शहनाजने या फोटोत ट्रॅक सूट आणि बेस बॉल हॅट घातली आहे.
मौनी रॉय

मौनी रॉयची फॅशन व स्टाईल आवडणारे लाखो लोक आहेत. या फोटोमध्ये मौनी मोनोक्रोम लूकमध्ये दिसते आहे. कॉफी-ब्राऊन रंगाची पॅन्ट व टॉपमध्ये मौनी नेहमीप्रमाणेच ग्लॅमरस दिसते आहे. ॲक्सेसरीज् म्हणून तिने ब्लॅक टिन्टेड स्क्वेअर सनग्लास आणि मास्क लावला आहे. या फोटोचे जबरदस्त वैशिष्ट्य आहे तिने लावलेला स्नेक प्रिंटवाला मास्क. जो एकदम हटके असून त्याला ग्रे चेन लावली आहे.
रश्मी देसाई

काळ्याशार रंगाचा होलटोन हॉल्टोन नेक आणि स्लीव्हलेस पद्धतीचा शॉर्ट बॉडीकॉन ड्रेस घालून, रश्मी देसाई या फोटोत बघा, फारच सुंदर दिसते आहे. त्यावर फक्त पोनी टेलची हेअर स्टाईल करून तिने आपलं रुप खुलविलं आहे आणि या काळ्या ड्रेसवर तशाच काळ्या रंगाचा मॅचिंग मास्क तिने चढवला आहे.
आकांक्षा पुरी

आपल्या कुर्तीला मॅचिंग होईल, असा मास्क आकांक्षा पुरीने या फोटोत घातलेला दिसत आहे. कुर्तीला मॅचिंग मास्क घालून आकांक्षा छान दिसते आहे.
श्रद्धा आर्य

‘कुंडली भाग्य’ फेम प्रीति म्हणजेच श्रद्धा आर्यचा ‘गिव्ह मी स्पेस’ मास्क खूपच फॅन्सी व संदेश देणारा आहे. तिची ही स्टाईल चाहत्यांना खूपच आवडली आहे.
जिया माणेक

‘साथ निभाना साथिया’ या टी. व्ही. कार्यक्रमातली गोपी बहू म्हणजेच जिया माणेकने वेगवेगळ्या प्रकारचे मास्क लावून सोशल मीडियावर आपले फोटो प्रसारित केले होते. पण तिचे हे मास्क चाहत्यांना रुचले नाहीत. त्यांनी यावर नाराजी व्यक्त केली.