बॉलिवूडच्या सुंदर अभिनेत्रींच्या ग्लॅमरस लेकी (...

बॉलिवूडच्या सुंदर अभिनेत्रींच्या ग्लॅमरस लेकी (Like Mother Like Daughter: Powerful Mother-Daughter Duos Of Bollywood)

बॉलिवूडमधे माय-लेकींच्या काही जोड्या आहेत, की ज्यांच्या सौंदर्याबद्दल नेहमीच बोललं जातं. यापैकीच काही बॉलिवूड सौंदर्यवतींच्या ग्लॅमरस लेकींबद्दल जाणून घेऊया.

सारा अली खान – अमृता सिंह

आपल्या काळात सुंदर आणि चंचल अभिनेत्री अशी ओळख असलेल्या अमृता सिंहची मुलगी सारा अली खान ही आपल्या आईसारखीच सुंदर आणि ग्लॅमरस आहे. या मायलेकींमध्ये जबरदस्त बॉन्डींग असून अमृता कायम आपल्या मुलीसोबत उभी राहते आणि नेहमी साराला सपोर्ट करते. सारा अली खान देखील आपल्या आत्ताच्या यशाचे श्रेय तिच्या आईला देते. आपल्याला घडविण्यामध्ये आईचा खूप मोठा सहभाग असल्याचं ती मानते.

आलिया भट्ट – सोनी राजदान

आलिया भट्ट आपली आई, सोनी राजदानची कार्बन कॉपी आहे. ती आपल्या आईसारखीच सुंदर आणि क्यूट दिसते. सोनी राजदान आपल्या मुलीच्या यशामुळे खूप खूश आहे. आलिया भट्टने लहानपणापासून काम करण्यास सुरुवात केली आणि अल्पावधीतच बॉलिवूडमध्ये आपली स्वतंत्र ओळख बनवली आहे.

करीना आणि करिश्मा – बबीता कपूर

करीना आणि करिश्मा या दोघींचं आपली आई बबीता कपूरवर खूप प्रेम आहे. आणि आज त्या दोघी ज्या यशोशिखरावर आहेत, त्यात आईचं सर्वाधिक योगदान आहे, असं त्या मानतात. बबीता कपूर देखील आपल्या दोन्ही लेकींच्या सुखदुःखात त्यांच्या सोबत असतात.

डिंपल कपाडिया – ट्विंकल खन्ना

गॉर्जियस डिंपल कपाडियाची लेक ट्विंकल खन्ना देखील खूप सुंदर दिसते. खरंतर अक्षय कुमारची पत्नी झाल्यानंतर ट्विंकल खन्नाने खूपच लवकर चित्रसृष्टीपासून दूर होण्याचा निर्णय घेतला. याउलट ट्विंकलची आई डिंपल अजुनही काही चित्रपटांत दिसते.

काजोल – तनुजा

आपल्या काळात अनेक सुपरहिट चित्रपटांत काम केलेल्या तनुजाजींच्या अभिनयानेच प्रेरित होऊन त्यांची लेक अर्थात काजोलनेही या चित्रसृष्टीत येण्याचा निर्णय घेतला. आपण अभिनय करण्यासाठी जन्म घेतलेला नाही, असं सुरुवातीला काजोलला वाटायचे. परंतु तुनजांना काजोल अभिनेत्री बनणार असा पूर्ण विश्वास होता. आईच्या या विश्वासामुळेच काजोल आज एक सफल अभिनेत्री आहे.