इब्राहिम अली खान हुबेहुब आपल्या वडिलांवर गेला आ...

इब्राहिम अली खान हुबेहुब आपल्या वडिलांवर गेला आहे, त्याला पाहिल्यानंतर चाहते म्हणतात, हा तर तरुणपणीचा सैफ आहे… (Like Father, Like Son: Ibrahim Ali Khan’s These Pictures Reminds Of Young Saif Ali Khan)

छोटे नवाब सैफ अली खानचा मोठा मुलगा म्हणजेच इब्राहिम अली खान सध्या खूप चर्चेत आहे. कधी पलक तिवारीसोबत डेट करत असल्याच्या बातमीमुळे तर कधी त्याच्या बॉलिवूड डेब्यूच्या चर्चेमुळे तो प्रकाशझोतात आहे. पण आणखी एका गोष्टीमुळे सर्वांच्या नजरा त्याच्यावर खिळल्या आहेत आणि ती म्हणजे इब्राहिमला जेव्हा केव्हाही स्पॉट केले जाते तेव्हा चाहते पापा सैफशी त्याची तुलना करू लागतात आणि इब्राहिमला पाहून चाहत्यांना तरुणपणीच्या सैफची आठवण येते.

इब्राहिमचे व्हायरल व्हिडिओ आणि फोटो पाहून तो तरुणपणीचा सैफ आहे, तसेच तो त्याच्या वडिलांची कार्बन कॉपी आहे असे चाहते म्हणतात. अलीकडेच सैफने मुलाबद्दल असेही म्हटले होते की, तो त्याच्या वयाप्रमाणे अगदी साध्या स्वभावाचा आहे. सैफ स्वतःही त्या वयात असताना तसाच होता आणि सैफ म्हणतो की, ही चांगली गोष्ट आहे. इब्राहिमही त्याच्या करिअरसाठी खूप मेहनत घेत आहे. तो शांत आणि सरळ आहे. सैफ म्हणतो की, इब्राहिम स्वतःही म्हणतो की, तो तरुणपणीच्या सैफसारखा दिसतो.

तुम्ही इब्राहिमचे लेटेस्ट फोटो बघा, जे पाहून तुम्हीही एकच म्हणाल- अरे, हा तर अगदी वडिलांसारखा आहे!

सैफ अली खानही वीस वर्षांपूर्वी असाच दिसत होता.

बहीण सारा व्यतिरिक्त, इब्राहिमचे धाकटे भाऊ तैमूर आणि जेह यांच्याशी देखील खूप चांगले नाते आहे आणि तो अनेकदा त्यांच्यासोबत वेळ घालवतो…

फोटो सौजन्य : इन्स्टाग्राम / saifalikhan_online/ibra._.pataudi