इम्रान हाश्मीच्या बायकोच्या भूमिकेत सई ताम्हणकर...

इम्रान हाश्मीच्या बायकोच्या भूमिकेत सई ताम्हणकर ( Leading Marathi Actress Sai Tamhankar To Play Imran Hashmi’s Wife In Hindi Film)

अभिनेत्री सई ताम्हणकरने मिमी या चित्रपटाद्वारे बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. या चित्रपटात तिची सहाय्यक भूमिका असली तरी तिच्या कामाचे खूप कौतुक केले गेले. त्या भूमिकेसाठी सईला सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्रीसाठी फिल्मफेअर आणि आयफा या दोन पुरस्कारांनी गौरवण्यात आले. आता सई पुन्हा एकदा बॉलिवूडमध्ये काम करण्यासाठी सज्ज झाली आहे.

यावेळी सई थेट इम्रान हाश्मीसोबत रोमान्स करताना दिसणार आहे.अभिनेता इम्रान हाश्मी काश्मिरमध्ये आपल्या आगामी ग्राउंड झिरो या चित्रपटाचे शूटिंग करत आहे. आता या चित्रपटात मराठमोळी अभिनेत्री सई ताम्हणकरची एण्ट्री होणार आहे.

ग्राउंड झिरो हा एक लष्करावर आधारित चित्रपट आहे. त्यात इम्रान लष्कर अधिकाऱ्याच्या भूमिकेत दिसणार आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन तेजस देवस्कर करत आहे.सई व्यतिरिक्त या चित्रपटात झोया हुसैनदेखील महत्वाच्या भूमिकेत दिसणार आहे.

मिळालेल्या माहितीनुसार या चित्रपटात सई ताम्हणकरसुद्धा काम करणार आहे. ती या चित्रपटात इम्रानच्या पत्नीची भूमिका साकारणार आहे. इम्रानला इंडस्ट्रीतील रोमॅण्टिक हिरो म्हटले जाते. त्यामुळे सईला इम्रानसोबत रोमान्स करताना पाहण्यासाठी चाहते उत्सुक आहेत.

ग्राउंड झिरो व्यतिरिक्त मधुर भांडारकरच्या इंडिया लॉकडाउन या चित्रपटातसुद्धा सई दिसेल. तसेच नुकतीच तिच्या फक्त महिला साथी या मराठी चित्रपटाचीसुद्धा घोषणा करण्यात आली. तर इम्रान हाश्मी ग्राउंड झिरो व्यतिरिक्त सलमान खानच्या टायगर 3 मध्ये दिसणार आहे.