राणादा-पाठक बाई पाठोपाठ तुमची मुलगी काय करते मा...

राणादा-पाठक बाई पाठोपाठ तुमची मुलगी काय करते मालिकेतील अभिनेता अडकणार विवाहबंधनात (Leading Actor of Serial “Tumchi Mulgi Kay Karte” Is preparing to Tie Knot after Ranada- Pathak Bai)

गेल्या काही दिवसांत हार्दिक-अक्षया, अक्षर-सानिया,  यांसारखे अनेक मराठी सेलिब्रेटी जोड्या विवाहबंधनात अडकल्या आहेत. तर बाळूमामा फेम सुमित पुसावळेकडे सुद्धा लग्नाच्या विधींना सुरुवात झाली आहे.

आता या जोड्यांमध्ये आणखी एका सेलिब्रेटीची भर पडली आहे. तो सेलिब्रेटी म्हणजे अभिनेता हरीश दुधाडे. पावनखिंड, फर्जंद यांसारख्या सुपरहिट चित्रपटांमध्ये काम केलेला अभिनेता हरीश दुधाडे आज विवाहबंधनात अडकणार आहे.

अभिनेता हरीश दुधाडेचा नुकताच साखरपुडा पार पडला. लोणावळ्यातील एका हॉटेलमध्ये पार पडलेल्या या साखरपुड्यात अनेक सेलिब्रेटींनी हजेरी लावली होती. हरीश मॉडेल असलेल्या समृद्धी निकमसोबत विवाहगाठ बांधणार आहे. हरीश आणि समृद्धी दोघेही अहमदनगरचे आहेत.

हरीशने आतापर्यंत नकळत सारे घडले, माझे मन तुझे झाले, तू सौभाग्यवती हो, तुमची मुलगी काय करते, सरस्वती या मालिकांमधून आपले अभिनय कौशल्य दाखवले आहे. यासोबतच तो नाटक आणि चित्रपटांमध्ये देखील काम करतो.