गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांना करोनाची लागण : आ...

गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांना करोनाची लागण : आयसीयू मध्ये दाखल (Lata Mangeshkar Tests Positive For Covid-19 : Admitted In ICU)

सध्या करोनाने पुन्हा डोके वर काढले आहे. सामान्य लोकांपासून बॉलिवूड, टेलिव्हिजन क्षेत्रातील कलाकार मंडळीही करोनाग्रस्त होऊ लागली आहेत. दररोज त्याबाबतच्या बातम्या ऐकू येऊ लागल्यात. त्यातच प्रख्यात गायिका लता मंगेशकर यांची आज ११ जानेवारी रोजी कोविड-19 चाचणी पॉझिटिव्ह असल्याचे आढळून आले आहे. सध्या लता दीदींना रुग्णालयात दाखल करण्यात आले असल्याची माहिती एएनआयने दिली आहे.

९२ वर्षीय ज्येष्ठ गायिका लता दीदींमध्ये करोनाची सौम्य लक्षणे दिसल्यानंतर त्यांना लगेचच अतिदक्षता विभागात (ICU) दाखल करण्यात आले होते, अशी माहिती त्यांची भाची रचना हिने वृत्तसंस्थेला दिली आहे.