लता मंगेशकर यांनी गायलेल्या संत ज्ञानेश्वरांच्य...

लता मंगेशकर यांनी गायलेल्या संत ज्ञानेश्वरांच्या रचना (Lata Mangeshkar Sings Sant Dnyaneshwar Songs)

काल गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर, गानसरस्वती लता मंगेशकर, यांनी गायलेल्या सुमधुर गीतांचा अल्बम प्रकाशित करण्यात आला. ‘भावार्थ माऊली’ या अल्बममध्ये महान संत ज्ञानेश्वर यांचे अभंग व कवितांवर आधारित १० गाण्यांचा समावेश असून त्याला पं. हृदयनाथ मंगेशकर यांनी संगीतबद्ध केले आहे. ज्ञानेश्वर महाराजांच्या १० महत्त्वाच्या मराठी रचनांचा परिचय या गाण्यातून करण्यात आला आहे. विशेष म्हणजे प्रत्येक गाण्याच्या आधी त्याचा खरा अर्थ सांगणारे समालोचन खुद्द लतादीदींनी केले आहे. सदर अल्बम यु ट्यूब व अन्य संगीत वाहिन्यांवर सारेगमातर्फे प्रकाशित करण्यात आला आहे.

” ‘भावार्थ माऊली’ या अल्बमच्या माध्यमातून मी व माझ्या भावाने, हृदयनाथने ज्ञानेश्वर माऊलींच्या प्रत्येक कवितेमधील सार उलगडत प्रत्येक गाण्याचा परिचय करून देण्याचा प्रयत्न केला आहे. मला आशा आहे की, ही सुंदर गाणी ऐकताना प्रेक्षकांना अध्यात्माची अनुभूती मिळेल,” असे भावपूर्ण उद्‌गार लतादीदींनी या प्रसंगी काढले.