मराठी कलावंतांच्या घरी गतवर्षी साजरा झालेला गणे...

मराठी कलावंतांच्या घरी गतवर्षी साजरा झालेला गणेशोत्सव: (Last Year’s Ganesh Chaturthi Celebration’s Of Marathi Artists)

गणपती बाप्पाचे आगमन अगदी उद्यावर येऊन ठेपले आहे. त्यामुळे  सगळीकडेच बाप्पाच्या तयारीची लगबग पाहायला मिळते. अशातच आपले ला़डके कलाकारसुद्धा आपल्या कामातून वेळ काढत बाप्पाच्या आगमनाची तयारी करत आहेत. आता आपण  गेल्या वर्षी काही कलाकारांच्या घरी आलेल्या बाप्पाचे फोटो पाहणार आहोत.

सुबोध भावे-

मराठी सिनेसृष्टीचा सुप्रसिद्ध अभिनेता सुबोध भावेच्या घरी दिड दिवसासाठी बाप्पा विराजमान होतात. गेल्यावर्षी सुबोधने बाप्पासाठी टोकियो ऑलिम्पिकचा देखावा  घरी तयार केला होता. आपल्या घरच्या बाप्पाचे फोटो त्याने इन्स्टाग्राम अकाउंटवर शेअर करत भारतासाठी पदक मिळवणाऱ्या सर्व खेळाडूंचा सन्मान आणि त्यांचे कौतुक असं कॅप्शन दिलं.

सुयश टिळक-

का रे दुरावा या मालिकेतून घराघरात पोहचलेल्या अभिनेता सुयश टिळकच्या घरीही बाप्पा विराजमान होतात. गेल्या वर्षी सुयशच्या घरी बाप्पासाठी फुलांची आरास केलेली. आपल्या घरच्या बाप्पाचे फोटो सुयशने इन्स्टाग्राम अकाउंटवर शेअर केले होते.

राकेश बापट

बॉलिवूडमधील मराठमोळा अभिनेता राकेश बापट गेले काही दिवस बिग बॉसमुळे चर्चेत होता. राकेशच्या घरीसुद्धा बाप्पा येतो. राकेशने आपल्या घरच्या बाप्पाचे फोटो सोशल मीडियावर पोस्ट केले होते. राकेशच्या बाप्पाचे वैशिष्ट्य म्हणजे तो स्वत: आपल्या हाताने बाप्पाची मूर्ती तयार करतो.

संकेत पाठक

लग्नाची बेडी फेम राघव म्हणजेच संकेत पाठकच्या घरी सुद्धा बाप्पा येतो. संकेतने सुद्धा आपल्या बाप्पाचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले होते.

भार्गवी चिरमुले

आई मायेचे कवच मालिकेतील प्रमुख भूमिका साकारणाऱ्या भार्गवी चिरमुलेच्या घरीही बाप्पा विराजमान होतात. गेल्या वर्षी तिच्याकडे पर्यावरणपूरक अशी वृक्षारोपण मूर्ती होती. भार्गवीने आपल्या बाप्पासाठी फुलांची आरास केली होती.

अभिनेता शंतानू मोघे आणि प्रिया मराठे

सध्या आपण शंतानूला आई कुठे काय करते आणि प्रिया मराठेला तुझेच मी गीत गात आहे या मालिकेत पाहतो. या दोघांच्या घरीसुद्धा बाप्पा विराजमान होतात. याच्या बाप्पाचे वैशिष्ट्य म्हणजे शंतानू आणि प्रिया आपल्या बाप्पासाठी घरातच वेगवेगळ्या प्रकारचा देखावा साकारतात.