लारा दत्ता – प्रतीक बब्बरची जमली जोडी! (L...

लारा दत्ता – प्रतीक बब्बरची जमली जोडी! (Lara Dutta And Prateik Babbar Maintains Chemistry Amongst Them)

सध्या बॉलिवूडमध्ये फारशी बिझी नसलेली लारा दत्ता ‘हिकअप्स आणि हुकअप्स ‘ या नव्या वेब सिरीजमध्ये दिसणार आहे. यात तिची जोडी प्रतीक बब्बरशी जमली आहे. लायन्सगेट प्ले,  या खास करून शहरी वातावरणातील कार्यक्रम बनविणाऱ्या कंपनीने  या मालिकेची निर्मिती केली आहे.
त्यांच्या  ‘हिकअप्स आणि हुकअप्स ‘ या नव्या कौटुंबिक मालिकेचा प्रीमियर शुक्रवार २६ नोव्हेंबरला लायन्सगेट प्ले वर प्रदर्शित होईल. या मालिकेचे कथानक वसुधा राव (लारा दत्ता) ही  एकल आई, तिचा भाऊ अखिल राव (प्रतीक बब्बर) आणि मुलगी कावन्या (शिनोबा) या तिघांभोवती फिरते. या तिघांना आयुष्यात काय काय संघर्ष करावा लागतो आणि कोणकोणत्या आव्हानांना सामोरे जावे लागते, त्याचे  हृदयस्पर्शी चित्रण या नव्या मालिकेत आहे.

या मालिकेचे दिग्दर्शन कुणाल कोहली यांनी केले असून लारा-प्रतीक व शिनोबा सह दिव्या सेठ, मीरा चोप्रा, अयान झोया यांच्या प्रमुख भूमिका आहेत.