सुष्मिता सेनशी जोडलेल्या संबंधांवरून ट्रोलर्सनी...

सुष्मिता सेनशी जोडलेल्या संबंधांवरून ट्रोलर्सनी जे नक्राश्रू ढाळले, त्यांना ललित मोदीने घेतले फैलावर, म्हणतो ‘जगा आणि जगू द्या’ (Lalit Modi Hits Back At Trolls Over His Relationship With Sushmita Sen, Says- ‘Live, Let Live’)

आयपीएल या क्रिकेट स्पर्धेचे माजी अध्यक्ष ललित मोदीने, अभिनेत्री सुष्मिता सेन सोबतचे अत्यंत खासगी व रोमॅन्टिक फोटो प्रसिद्ध करून, सोशल मीडियावर आपल्या प्रेमाचे प्रदर्शन केले. दोघे लग्न करू शकत, असाही संदेश दिला.

ललित मोदीची ही पोस्ट गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडिया वर गाजते आहे. सुष्मिताच्या या नव्या नात्याबद्दल लोक मात्र त्रस्त झाले असून वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहेत. दोघांच्या प्रेमसंबंधांची थट्टा करत ट्वीटरवर भरपूर मीम्स्‌ धाडत आहेत. विशेष करून ललित मोदीवर टिकेचा भडिमार होत आहे. आपल्या प्रेमाची पोस्ट सुष्मिताच्या ओरिजिनल ट्वीटर अकाउंट वर करण्याऐवजी त्याच्या पॅरडी अकाऊंट वर टॅग केल्याने ललितची खिल्ली हे लोक उडवत आहेत. पण या सर्व निंदेवर ललित मोदीने इन्स्टाग्राम वर एक लांबलचक पोस्ट लिहून या निंदकांना फैलावर घेतले आहे.

सुष्मिता सोबत एक फोटो प्रसिद्ध करून ललितने कडक भाषेत प्रतिक्रिया दिली आहे. तो म्हणतो, ‘सुष्मिता सेनच्या चुकीच्या अकाऊंटवर टॅग केलं म्हणून मीडियाचे लोक माझ्यावर टिका का करत आहेत, तेच कळत नाही. पोस्ट टॅग करण्यात मी काहीच चूक केलेली नाही. आपण अजून जुन्या जमान्यात वावरतोय्‌ आपण अजून जुन्या जमान्यात वावरतोय्‌ असं दिसतंय्‌. दोन व्यक्ती चांगले मित्र होऊ शकत नाहीत किंवा त्यांच्यात चांगली केमिस्ट्री व टायमिंग आहे म्हणून मॅजिक होऊ शकते, हे बहुधा आपल्याला पटत नाहिये. तेव्हा माझा तुम्हा लोकांना सल्ला आहे की, जगा आणि जगू द्या.’

काही मीडिया रिपोर्टमध्ये असंही लिहिलं गेलं आहे की, ललित मोदीने आपल्या आईच्या मैत्रिणीशी लग्न केलं होतं. या संदर्भात बरंच काही लिहिलं गेलं होतं. असे लिहिणाऱ्यांचा ललितने खरपूस समाचार घेतला आहे. तो लिहितो, ‘तुमच्या माहितीसाठी सांगतो की, माझी दिवंगत पत्नी मीनल मोदी, माझी १२ वर्षे चांगली मैत्रिण होती. ती माझ्या आईची मैत्रिण नव्हती. ही अफवा लोकांनी आपल्या फायद्यासाठी पसरवली होती. अशा प्रकारच्या खुज्या मानसिकतेमधून बाहेर निघा. अन्‌ दुसऱ्यांच्या आनंदात आनंद घ्यायला शिका.’

लोकांनी ललितला पळपुट्या म्हणून हिणवलं, त्याच्यावर ललितने राग व्यक्त करत लिहिलंय्‌, ‘मी नेहमीच ताठ मानेनं चालतोय्‌ अन्‌ लोक मला पळपुट्या म्हणतात. मला कोणत्या कोर्टाने गुन्हेगार ठरवलंय्‌ ते तरी दाखवा. जे मी देशाला दिलंय्‌, ते अन्य कोणी दिलंय्‌ का ते तरी दाखवा. असलं काही बोलताना तुम्हाला शरम वाटली पाहिजे. थोडातरी घरबंद ठेवा.’

मोदीसोबत लग्न आणि साखरपुड्याच्या बातम्यांवर सुष्मिताने पण प्रतिक्रिया दिली आहे. लग्न झालेलं नाही. अंगठी घातलेली नाही, फक्त खूप प्रेम आहे, असं ती म्हणते.