लालबागच्या राजाचे लाईव्ह दर...

लालबागच्या राजाचे लाईव्ह दर्शन होणार (Lalbaugh Raja’s Puja And Maha Aarti To Be Viewed On Live Platforms)

देशभरात लोकप्रिय झालेला मुंबईचा  लालबागचा राजा, आता लाईव्ह टी. व्ही. प्रक्षेपणाद्वारे घराघरात पोहचणार आहे. करोनाच्या महामारीमुळे गणेशभक्त लालबागचा राजा किंवा अन्य सार्वजनिक गणपतींचे दर्शन घेऊ शकणार नाहीत. या निर्बंधामुळे गणेशभक्तांच्या सोयीसाठी शेमारू एन्टरटेनमेन्ट  कंपनीच्या सर्व ऑनलाईन मंचावर राजाचे हे दर्शन पहिल्या दिवसापासून होणार आहे.

Lalbaugh Raja’s Puja, Live Platforms

शेमारूचा अँप डाउनलोड करून भक्तमंडळी कधीही, कुठेही श्रीगणेशाचे लाईव्ह दर्शन आणि महाआरतीचा लाभ सर्व आपल्या स्क्रीनवर घेऊ शकतील.  ही सेवा मोफत आहे. शेमारू एन्टरटेनमेन्ट गेल्या १० वर्षांपासून हे लाईव्ह दर्शन घडवत आले आहेत.

Lalbaugh Raja’s Puja, Live Platforms
Lalbaugh Raja’s Puja, Live Platforms

“तंत्रज्ञानाच्या शक्तीचा लाभ घेऊन या लोकप्रिय गणेशाचे दर्शन आम्ही थेट प्रक्षेपणाने  भक्तांच्या घराघरामध्ये पोहचवत आहोत, याचा आम्हाला खूप आनंद आहे. लालबाग गणेशोत्सव मंडळाच्या सहयोगाने हे जमले आहे,” असे शेमारूचे सीईओ हिरेन गडा यांनी सांगितले.