स्वाभिमानी कुसुमचे अनुजशी लग्न, विघ्न न येता पा...

स्वाभिमानी कुसुमचे अनुजशी लग्न, विघ्न न येता पार पडेल का? (Kusum Ready To Marry Anuj; Will The Ceremony Take Place Without Hassles?)

सोनी मराठी वाहिनीवर अलीकडेच प्रदर्शित होणारी कुसम ही मालिका दर्शकांना फारच आवडत आहे. दर्शकांना या मालिकेतील पात्रं ही आपल्या घरातल्या सदस्यांसारखीच वाटतात. लवकरच ‘कुसुम’ या मालिकेत प्रेक्षकांना कुसुम आणि अनुज यांचा विवाह सोहळा पाहायला मिळणार आहे.

संपूर्ण कुटुंबाची जबाबदारी घेणारी, आई-वडिलांची काळजी करणारी स्वाभिमानी कुसुम आता अनुज सरनोबत याची बायको होणार आहे. अनुजने कुसुमची अट मान्य केल्याने तिला जपणारा समजुतदार मुलगा अखेरीस तिला मिळाला आहे. कुसुम तिच्या गुणांनी सरनोबतांच्या घरी सगळ्यांची लाडकी झाली आहे. कुसुम अनुज यांच्या चाहत्यांनी सोशल मीडियावरही त्यांच्या लग्नाच्या तयारीला चांगलाच प्रतिसाद दिला आहे. #कुसुमनुज हा हॅशटॅग चाहत्यांनी निवडला असून लग्नासाठी सगळेच उत्सुक आहेत. तेव्हा हे लग्न विघ्न न येता पार पडेल का? ते पाहायचं आहे. कुसुम ही मालिका एकता कपूरच्या हिंदी कुसुम मालिकेचा रिमेक आहे.