‘कुछ-कुछ होता है’चित्रपटातील लहान अंजली अर्थात ...

‘कुछ-कुछ होता है’चित्रपटातील लहान अंजली अर्थात सना सईदने बॉयफ्रेंड सबा वोनरसोबत केला साखरपुडा, त्यांचे फोटो आणि व्हिडिओ होताहेत व्हायरल (Kuch-Kuch Hota Hai actress Sana Saeed gets engaged to boyfriend Csaba Wagner, See Photos And Video)

‘कुछ कुछ होता है’ या ब्लॉकबस्टर चित्रपटात शाहरुख खान आणि राणी मुखर्जीच्या मुलीची भूमिका साकारणारी सना सईद आता मोठी झाली आहे. नुसतीच मोठी नाही तर बालिकही झाली आहे. सनाने तिचा बॉयफ्रेंड सबा वोनरसोबत एंगेजमेंट केली आहे. तिने तिच्या बॉयफ्रेंडसोबतच्या साखरपुड्याची गोड बातमी सोशल मीडियावर शेअर केली आहे.

​​सना सईदने तिचा प्रियकर सबा वोनरसोबत लॉस एंजेलिसमध्ये एंगेजमेंट केली असून आता सनाचे हे वर्ष खूप खास झाले आहे. सनाने नुकतीच तिच्या एंगेजमेंटची आनंदाची बातमी सोशल मीडियावर शेअर केली आहे.

सुंदर सजावट आणि पार्श्वभूमी असलेल्या वातावरणात, सबाने गुडघ्यावर बसून आपली प्रेमिका सनाला प्रपोज केले. हे सर्व पाहून सनाला धक्काच बसला. सनाच्या चेहऱ्यावरच्या हावभावावरून स्पष्ट दिसते की हे सर्व सनासाठी सरप्राईज होते, तिला या प्रपोजलबद्दल काहीच माहिती नव्हते.

सना आणि सबाने खूप रोमँटिक पोज दिल्या आहेत. अन्‌ पोज देताना, अभिनेत्रीने तिची सुंदर निळ्या रंगाची एंगेजमेंट रिंग देखील फ्लॉन्ट केली आहे.

सरप्राईज प्रपोजल दरम्यान सना सईद ब्लॅक थाई हाय स्लिट गाऊनमध्ये दिसली. त्यासोबत अभिनेत्रीने लांब बूट घातले होते. अॅक्सेसरीजच्या नावावर अभिनेत्रीने फक्त सोन्याची चेन घातली. मेक-अप खूपच कमी होता. अभिनेत्रीने केस खुले ठेवले होते आणि या लूकमध्ये अभिनेत्री खूपच सुंदर दिसत होती. तर बॉयफ्रेंड सबा देखील सनासोबत काळ्या रंगात ट्विन्स करताना दिसला.

‘कुछ कुछ होता है’ या चित्रपटानंतर ‘स्टुडंट ऑफ द इयर’ आणि ‘फगली’मध्ये दिसलेल्या सना सईदने तिच्या इन्स्टाग्रामवर तिच्या एंगेजमेंटचा व्हिडिओ शेअर केला आहे. हा व्हिडिओ सबाच्या प्रपोजलपासून सुरू होतो. ३४ वर्षीय सना ‘बाबुल का आंगन छोडू ना’, ‘खतरों के खिलाडी’, ‘नच बलिए’, ‘लो हो गई पूजा इस घर की’ या लोकप्रिय टीव्ही शोमध्येही दिसली.