‘मी तिला लाथ घालणार होती…’ कं...

‘मी तिला लाथ घालणार होती…’ कंगनाचे ट्‌वीटर बंद केल्यावर कुब्रा सैतची प्रतिक्रिया (Kubbra Sait Reacts To Kangana Ranaut’s Twitter Suspension)

नेहमीच स्वतःहून वादविवाद ओढवून घेणाऱ्या कंगना रणौतचा ट्‌वीटर अकाऊंट बंद करण्यात आल्याने पुन्हा चर्चेत आली आहे. मात्र अभिनेत्री कुब्रा सैतला या गोष्टीचा मोठाच आनंद झाला आहे. तिनं आपली संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.

सदैव बेताल आणि बिनधास्त वक्तव्य करणारी कंगना रणौत पश्चिम बंगालच्या विधानसभा निवडणूक निकालांमुळे पुन्हा वादाच्या भोवऱ्यात सापडली. सदर निवडणूकीत झालेल्या हिंसाचाराची छायाचित्रे व व्हिडिओ कंगना शेअर करत होती. ट्वीटरने आपल्या नियमांचे पालन करत कंगनाचा ट्वीटर अकाऊंट सस्पेंड केला आहे.

या बंदीमुळे कंगनाचे चाहते आणि काही मान्यवरांनी उलटसुलट प्रतिक्रिया दिल्या. ‘सेकंड गेम्स’ या वेब सिरीजची अभिनेत्री कुब्रा सैतला मात्र याबाबत परमानंद  झाला. तिनं संतप्त प्रतिक्रिया देत म्हटलं, ”मला जर कधी ती भेटली असती तर तिला डाव्या पायाची लाथ घालण्याच्या मनःस्थितीत मी होती. पण हा मार्ग योग्य आहे. मला कायमचा दिलासा मिळाला आहे. तिच्याशिवाय सोशल मीडिया खूप चांगला असेल.” कुब्रा सैतने असे भयंकर ट्वीट करून कंगना रणौतचा ट्वीटर अकाऊंट सस्पेंड केलेल्या संदेशाचा स्क्रीन शॉट पाठवून, जणू कंगनाच्या जखमेवर मीठ चोळलं आहे. कुब्रा सैतचे हे ट्वीट सोशल मीडियावर खूपच व्हायरल झाले असून युजर्स त्यावर बरेच कमेंटस्‌ देत आहेत.