वन नाईट स्टँडनंतर कुब्राचं प्रेग्नंट होणं अन् आ...

वन नाईट स्टँडनंतर कुब्राचं प्रेग्नंट होणं अन् आठवड्याभरात अबॉर्शन : कुब्रानं सांगितला धक्कादायक किस्सा (Kubbra Sait got pregnant following a one-night stand, got an abortion, Says- she has ‘no regrets’)

‘सेक्रेड गेम’ या वेब सीरिजनंतर ‘लाईम लाईट’मधे आलेली अभिनेत्री कुब्रा सैत (Kubbra Sait) हिने नुकतेच एक पुस्तक लाँच केले आहे. ‘ओपन बुक : नॉट क्वाईट अ मेमॉयर’ असे या पुस्तकाचे नाव आहे. या पुस्तकात तिने तिच्या आयुष्यातील अनेक धक्कादायक खुलासे केले आहेत. या पुस्तकात तिने तिच्यासोबत झालेल्या शारीरिक शोषणपासून ते बॉडी शेमिंगपर्यंत सर्व गोष्टींचा खुलासा केला आहे. त्यातील एक किस्सा सध्या सोशल मीडियावर चांगलाच गाजतोय. स्वत:च्या मनावरचा ताबा सुटला अन् त्या रात्री जे घडलं ते कुब्रानं कुठलीही लाज न बाळगता उघडपणे या पुस्तकात सांगितलंय.

२०१३ मधला हा किस्सा आहे. मित्रासोबत अंदमानच्या समुद्रात स्कूबा डायव्हिंग केल्यानंतर दोघे परतले आणि त्यानंतर त्या रात्री जे घडलं ते कुब्रासाठी देखील अनपेक्षित होतं. नशेत भान नसलेल्या कुब्राने ती रात्र मित्रासोबत घालवली. नशेत दोघांच्याही मनावरचा ताबा सुटला आणि त्या रात्री दोघांचे शारिरीक संबंध झाले. त्यानंतर काही दिवसांनी तिने प्रेग्नन्सी टेस्ट केल्यानंतर ती पॉझिटिव्ह आली होती.

अंदमानच्या त्या वन नाईट स्टँडनंतर कुब्राचं प्रेग्नंट होणं खरं तर तिच्यासाठी अनपेक्षित होतं. प्रेग्नंसीची बातमी कळताच लगेच आठवड्याभरात तिने अबॉर्शन करण्याचा निर्णय घेतला. मात्र तिला त्याचं वाईट वाटत नाही असं ती उघडपणे सांगते.

‘वयाच्या २३ व्या वर्षी लग्न आणि तिसाव्या वर्षी मुलं ही कॉन्सेप्ट मला कधीच पटली नाही,’ असं ती म्हणते. त्यामुळे नशेत का होईना पण त्या रात्री मित्रासोबत घडून आलेल्या त्या वन नाईट स्टँडचा तिला कधीच पश्चाताप झाला नाही असं ती उघडपणे सांगते.

कुब्रा सैतनं तिच्या बॉलिवूड करिअरची सुरुवात सलमान खानच्या ‘रेडी’ चित्रपटातून केली होती. या चित्रपटात तिची खूपच छोटीशी भूमिका होती. त्यानंतर तिने ‘जवानी जानेमन’, ‘सुल्तान’, ‘सिटी ऑफ लाइफ’ या चित्रपटांमध्ये काम केलं. पण तिला खरी ओळख मात्र ओटीटी वेब सीरिज ‘सेक्रेड गेम्स’मधूनच मिळाली.