कृष्णा अभिषेकचा’ द कपिल शर्मा शो’ ल...

कृष्णा अभिषेकचा’ द कपिल शर्मा शो’ ला रामराम: कारण काय?… जाणून घ्या (Krushna Abhishek Quits ‘The Kapil Sharma Show’, Won’t Be Part Of Upcoming New Season)

सोनी टीव्हीवर प्रसारित होणार्‍या ‘द कपिल शर्मा शो’ या कॉमेडी शो मधून घराघरात लोकप्रिय झालेली सपना उर्फ ​​कृष्णा अभिषेक आता येणाऱ्या नव्या सीझनमध्ये दिसणार नाही. खुद्द कृष्णा अभिषेकने या गोष्टीला दुजोरा दिला आहे. चाहत्यांच्या आग्रहाखातर द कपिल शर्मा शोचा नवीन सीझन पुढील महिन्यापासून सुरू होणार आहे. मात्र या शोमध्ये सपना हे पात्र साकारणारा विनोदी अभिनेता कृष्णा अभिषेक नव्या सीझनमध्ये दिसणार नसल्याचे निश्चित झाले आहे.

त्यामुळे या नव्या सीझनमध्ये सपना हे पात्र पाहायला मिळणार नाही. ‘द कपिल शर्मा शोचा आगामी सीझन सपना या पात्राशिवाय होणार असल्यामुळे अनेकांना त्याबाबत प्रश्न पडले आहेत. या शोमधील सपना या पात्राचे अनेक चाहते होते. त्यामुळे कृष्णा आगामी सीझनमध्ये दिसणार नसल्याने त्याचे चाहते नाराज झाले आहेत.द कपिल शर्मा शो मध्ये कृष्णाने जॅकी दादा, धर्मेंद्र यांसारखे स्टार्स आणि सपना हे पात्र साकारून चाहत्यांची मने जिंकली होती.

सुनील ग्रोवरने हा शो सोडल्यावर प्रेक्षकांना सपना हे पात्र आवडू लागले होते. पिंकविलाला दिलेल्या मुलाखतीत कृष्णाने सांगितले की, अॅग्रीमेंट चा इश्यू असल्यामुळे मी हा शो करत नाही. याहून अधिक त्याने काही सांगितले नाही. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, कृष्णा आणि निर्मात्यांमध्ये मानधन या मुद्द्यावरून भांडणे चालू आहेत.

त्यामुळे त्यांच्यातील वाद लवकर मिटून कृष्णा लवकर सपनाच्या भूमिकेत दिसेल अशी चाहत्यांना आशा आहे. कपिल शर्मा आणि कृष्णामध्ये वाद चालू असल्यामुळे सुद्धा कृष्णा हा शो सोडत असल्याचे बोलले जाते.