ह्रतिक रोशनला टक्कल पडल्याचे दाखवत केआरकेने उडव...

ह्रतिक रोशनला टक्कल पडल्याचे दाखवत केआरकेने उडवली खिल्ली (KRK Made Fun Of Hrithik Roshan On Social Media)

केआरके म्हणजेच कमल आर खान कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत राहण्याचा प्रयत्न करत असतो. बॉलिवूडकर तर सतत त्याच्या निशाण्यावर असतात. सोशल मीडियावर तो अनेकदा बॉलिवूडकरांच्या नावाने ताशेरे ओढत असतो. आता पुन्हा एकदा केआरकेने आपल्या सोशल मीडिया अकाउंटवर एक नवा व्हिडिओ शेअर केला आहे. त्या व्हिडिओत त्याने ह्रतिक रोशनची खिल्ली उडवली आहे.

काही दिवसांपूर्वीच ह्रतिकने आपल्या गर्लफ्रेंड सबा आझादसोबत अभिनेत्री भाग्यश्री मोटे व मेकअप आर्टिस्ट विजय पालांडे यांच्या साखरपुड्याला हजेरी लावली होती. तेव्हाचा ह्रतिकचा व्हिडिओ सोशल मीडियावर खूप व्हायरल झाला होता. एका व्हिडिओत ह्रतिकला मागच्या बाजूने टक्कल पडलेलं दिसत होतं.

केआरकेने लगेचच तो व्हिडिओ आपल्या ट्विटरवर शेअर केला व ह्रतिकची खिल्ली उडवण्यास सुरुवात केली. या व्हिडिओला त्याने जेव्हा ह्रतिक रोशन हेअर पॅच लावायला विसरतो…. असे कॅप्शन दिले.

केआरकेने व्हिडिओ शेअर करताच सोशल मीडियावर समिश्र प्रतिक्रिया येत आहेत. काही जण ह्रतिकची खिल्ली उडवत आहेत. तर काहीजण केआरकेवर भडकले आहेत.

त्याला टक्कल असलं तरी तो देखणा दिसतो, तू तुझं बघ अशी एकाने कमेंट केली आहे. तर एकाने ब्रेन सर्जरीमुळे ह्रतिकला हे झालंय, तुझ्या सारख्या लोकांना ते विचित्र वाटू शकतं असे केआरकेला म्हटले आहे.

ह्रतिक रोशनबद्दल बोलायचे झाल्यास काही दिवसांपूर्वीच त्याचा विक्रम वेधा हा चित्रपट प्रदर्शित झाला. याशिवाय तो लवकरच सिद्धार्थ आनंद यांच्या फायटर या चित्रपटात दिसणार आहे. या चित्रपटात त्याच्यासोबत दीपिका पादुकोण दिसणार आहे.