सेल्फीमधल्या या अभिनेत्याला केआरकेने म्हटले पनव...
सेल्फीमधल्या या अभिनेत्याला केआरकेने म्हटले पनवती!! म्हणाला या पणवतीमुळेच चित्रपट झाला फ्लॉप (KRK calls this ‘Selfiee’ actor Panauti, Says- Film is disaster because of this Panauti actor)

अक्षय कुमारचा चित्रपट ‘सेल्फी’ बॉक्स ऑफिसवर फारशी चमक दाखवू शकला नाही. चित्रपट वाईटरित्या फ्लॉप झाला आहे. अशा परिस्थितीत बॉलिवूडला नेहमीच टार्गेट करणारा आणि स्वत:ला मोठा चित्रपट समीक्षक म्हणवणारा कमल रशीद खान उर्फ केआरकेने या चित्रपटासाठीसुद्धा तोंड उघडले आहे. केआरकेने चित्रपटातील एका अभिनेत्याला पनवतीचा टॅग दिला असून त्यांच्यामुळेच हा चित्रपट फ्लॉप झाल्याचे म्हटले आहे.
नव्या ट्विटमध्ये, KRK ने इमरान हाश्मीवर निशाणा साधला आहे आणि दावा केला आहे की इमरानच्या फ्लॉप चित्रपटांमुळे आता ‘टायगर 3’ मधून त्याचे सीन कापले जात आहेत. एका युजरने ट्विटरवर इमरान हाश्मीच्या मागील अनेक फ्लॉपचा उल्लेख केला होता, त्यामध्ये चेहरे, मुंबई सागा आणि आता सेल्फी या चित्रपटाचा समावेश होता. त्याच युजरला टॅग करत KRK ने ट्विट केले की, “होय, हे सर्व चित्रपट इमरान हाश्मीच्या पनवतीमुळे फ्लॉप झाले होते. आणि आता आदि चोप्राने आपला चित्रपट या संकटातून वाचवण्यासाठी ‘टायगर 3’ मधून इमरानचे जास्तीत जास्त सीन्स कापले आहेत.”

याआधी केआरकेने द कपिल शर्मा शो आणि क्रिती सेननला पनवती म्हटले आहे. यापूर्वी केआरकेने लिहिले होते की, “शाहरुख खानने कपिल शर्माच्या शोमध्ये ‘पठाण’चे प्रमोशन केले नाही म्हणून हा चित्रपट सुपरहिट झाला. कपिल शर्माच्या शोमध्ये ‘द कश्मीर फाइल्स’ या चित्रपटाचे प्रमोशन झाले नव्हते आणि हा चित्रपट सुपरहिट ठरला होता. त्यामुळे द कपिल शर्मा शो ही चित्रपटांसाठी मोठी पनवती असल्याचा हा पुरावा आहे.

यापूर्वी, त्याने क्रिती सेनॉनबद्दल वादग्रस्त ट्विट केले होते, “अभिनेत्री क्रिती सेनन ही बॉलिवूडची सर्वात मोठी पनवती अभिनेत्री आहे. ज्या चित्रपट येते, तो तिच्याबरोबर बुडतो. तो भेडिया ला तिने खाल्ले, आता 600 कोटींचा आदिपुरुषही बुडवणार आहे.

केआरके स्वत: त्याच्या ट्विट्समुळे ट्रोल होतो. ट्विटरवर लोक त्याची खूप शाळा घेतात. त्यांच्या कट्टरतेमुळे त्याला अनेकवेळा अडचणींचा सामना करावा लागला आहे. तरीही तो या गोष्टी करायचे कमी करत नाही.

अक्षय कुमारचा ‘सेल्फी’ हा चित्रपट २४ फेब्रुवारीला प्रदर्शित झाला आहे. पण हा चित्रपट पहिल्याच दिवशी बॉक्स ऑफिसवर फ्लॉप झाला. चित्रपटाची ओपनिंग खूपच खराब झाली असून वीकेंडलाही ‘सेल्फी’ला चांगला प्रतिसाद मिळालेला नाही. चित्रपट प्रदर्शित होऊन 5 दिवस झाले असून 150 कोटींच्या बजेटमध्ये बनवलेला ‘सेल्फी’ आत्तापर्यंत केवळ 12.70 कोटी कमवू शकला आहे.