केआरकेने कियाराला दिली इमरान हाश्मीची उपमा, अभि...

केआरकेने कियाराला दिली इमरान हाश्मीची उपमा, अभिनेत्रीच्या चाहत्यांनी घेतला केआरकेचा समाचार (KRK Calls Kiara Advani Ladkiyon Ki Emraan Hashmi, Fans Slams Him, Says- Tum Kal Bhi Badtameez the Aaj Bhi ho)

स्वत:ला एक मोठा चित्रपट समीक्षक, चित्रपट निर्माता आणि अभिनेता म्हणणारा कलाकार म्हणजे कमल आर खान. तो दररोज बॉलिवूडला टार्गेट करत असतो आणि ट्विटरवर बॉलिवूड स्टार्स आणि चित्रपटांवर नकारात्मक टिप्पणी करुन चर्चेत राहण्याचा प्रयत्न करतो. आता यावेळी केआरकेने करण जोहर आणि त्याच्या नुकताच प्रदर्शित झालेल्या ‘जुग जुग जिओ’ चित्रपट आणि कियारा अडवाणीवर स्वत:चे मत मांडले आहे. त्याने कियारा लेडीज इमरान हाश्मी असल्याचे म्हटले आहे. त्याच्या या विधानामुळे त्याला सोशल मीडियावर प्रचंड ट्रोल केले जात आहे.

करण जोहरचा चित्रपट ‘जुग जुग जिओ’ रिलीज झाल्यापासून केआरके सतत चित्रपट आणि त्यातील स्टारकास्टला टार्गेट करत आहे. ट्विट करताना केआरकेने वरुण धवन, कियारा अडवाणीपासून करण जोहरपर्यंतच्या अनेक पोस्ट्स केल्या आहेत. त्याने ट्विटरवर कियाराची खिल्ली उडवली आणि लिहिले – “लेडीज इमरान हाश्मी, उंची कमी चुंबन जास्त. कियारा अडवाणीने आतापर्यंत ‘कबीर सिंग’ आणि ‘भूल भुलैया 2’ हे दोनच हिट चित्रपट दिले आहेत. दोन्ही चित्रपटात कियारा ऐवजी कोणतीही अभिनेत्री असती तरी चित्रपट हिट झाला असता. ‘लक्ष्मी’, ‘कलंक’, ‘इंदू की जवानी’, ‘टाइम मशीन’ आणि ‘जुग जुग जिओ’ हे तिचे पाच फ्लॉप चित्रपट आहेत.

केआरकेने आणखी काही ट्विटमध्ये ‘जुग जुग जिओ’ अपयशी चित्रपट असल्याचे म्हटले आहे. तसेच त्याने वरुण धवन आणि करण जोहरची खिल्लीही उडवली आहे. केआरकेने ‘भूल भुलैया 2’च्या यशाचे श्रेय कार्तिक आर्यनला दिले. तसेच लिहिले की, ‘जुग जुग जिओ’च्या खराब कामगिरीवरून असे दिसून येते की लोक लेडीज इमरान हाश्मी म्हणजेच अभिनेत्री कियारा अडवाणीचा कोणताही चित्रपट पाहत नाहीत.

केआरकेचे हे ट्विट पाहून कियाराचे चाहते संतापले आहेत.  एका युजरने लिहिले- तुझे फालतू ट्विट पाहून मला वाटते की तू कालही असभ्य होतास, आजही असभ्य आहेस. तर आणखी एका यूजरने लिहिले असे वाटते की कियाराने तुम्हाला पैसे दिले नाहीत. तर एकाने केआरकेला म्हातारा काका असे म्हटले आहे.

 ‘जुग जुग जिओ’ नुकताच प्रदर्शित झाला आहे. सध्या या चित्रपटाला संमिश्र प्रतिक्रिया मिळत आहेत. या चित्रपटाने पहिल्याच आठवड्यात 35 कोटींची कमाई केली असून वर्षभरात सर्वाधिक कमाई करणारा चौथा चित्रपट ठरला आहे.