सलमान खानला डरपोक, गुंड, कवडीची किंमत नसलेला स्...

सलमान खानला डरपोक, गुंड, कवडीची किंमत नसलेला स्टार वगैरे शेलक्या शब्दांनी हिणवून झाल्यावर के आर केचा साळसूद माफीनामा (KRK Apologises To Salman Khan, Says- Bhai jaan I Am really sorry for misunderstanding you)

स्वघोषित चित्रपट समीक्षक, चित्रपट निर्माता आणि अभिनेता कमाल रशीद खान आणि बॉलिवूडचा भाईजान सलमान खान यांच्यात छत्तीसचा आकडा  आहे. केआरकेने त्याला भ्याड गुंड, कवडीची किंमत नसलेला असेही म्हटले आहे. गेल्यावर्षी सलमान खानला 56 व्या वाढदिवसाच्या एक दिवस आधी साप चावला होता तेव्हाही केआरकेने ट्विट करत लिहिले की, “सापाने बरोबर केले, पण बिचारा स्वतः मेला, कारण समोरच्यामध्येच खूप विष आहे. “

सलमान खानवर अतिशय आक्षेपार्ह टिप्पणी करणाऱ्या केआरकेने अखेर भाईजानची माफी मागितली आहे. अनेकदा आपल्या ट्विट आणि चित्रपट समीक्षणाच्या माध्यमातून बॉलिवूडला टार्गेट करणाऱ्या केआरकेने आता ट्विटमध्ये  सलमान खानची माफी मागितली असून आपल्याला तुरुंगात पाठवण्यात सलमान खानचा कोणताही हात नसल्याचे म्हटले आहे.

केआरकेने आपल्या ट्विटमध्ये लिहिले की, “मी सर्व मीडियाकर्मींना सांगू इच्छितो की माझ्या अटकेमागे सलमान खानचा हात नाही, यामागे दुसऱ्याच कोणाचा तरी हात आहे. भाईजान सलमान खान तू मला माफ कर, माझा तुझ्याबद्दल गैरसमज झाला. मी तुला कोणत्याही प्रकारे दुखावले असल्यास मी माफी मागतो. तसेच मी माझ्या स्वेच्छेने ठरविले आहे की यापुढे मी तुझ्या चित्रपटांचे समीक्षण करणार नाही.

केआरकेने करण जोहरबद्दल सुद्धा आणखी एक ट्विट लिहिले की, “अनेक लोकांना वाटते की माझ्या अटकेमागे करण जोहरचा हात होता, पण मी पुन्हा एकदा सांगतो की माझ्या अटकेशी करण जोहरचा काहीच संबंध नाही.”

काही महिन्यांपूर्वी केआरकेला त्याच्या वादग्रस्त ट्विटसाठी मुंबई पोलिसांनी अटक केली होती. त्यानंतर त्याला 10 दिवस तुरुंगात काढावे लागले होते. तेव्हा केआरकेने करण जोहर, सलमान खानसह अनेक बॉलिवूड सेलिब्रिटींना आपल्या अटकेसाठी कारणीभूत ठरवले होते. मात्र तुरुंगातून बाहेर आल्यानंतर त्याचा सूर बदलला आणि त्याने स्वत:चे शब्द मागे घेतले.