‘तांडव’च्या प्रदर्शनानंतर सोशल मिडि...

‘तांडव’च्या प्रदर्शनानंतर सोशल मिडियावर व्हायरल होत आहेत कृतिका कामराचे बोल्ड फोटो! (Kritika Kamra’s Bold Pics Goes Viral On Social Media After ‘Tandav’ Release)

अलीकडेच प्रदर्शित झालेली सैफ अली खानची ‘तांडव’ ही वेब सिरीज सध्या वादग्रस्त ठरत आहे. या वेब सिरीजमध्ये हिंदूच्या धार्मिक भावना दुखावतील असं चित्रित करण्यात आलं असल्याचं म्हटलं जात असतानाच दुसरीकडे या वेब सिरिजमध्ये काम करणाऱ्या सर्वच कलाकारांच्या अभिनयाची मात्र सर्वत्र प्रशंसा केली जात आहे. ‘तांडव’ मध्ये सनाच्या प्रमुख भूमिकेत असणारी टीव्हीवरील कलाकार कृतिका कामराचे फोटो इंटरनेटवर व्हायरल होत आहेत. पाहूया कृतिका कामराचे व्हायरल होणारे हे बोल्ड आणि हॉट फोटो…

ही वेब सिरीज राजनैतिक पाश्वभूमीवर आधारित आहे.

‘तांडव’ मध्ये कृतिकाने सना नावाच्या कॉलेज स्टुडंटची भूमिका साकारली आहे.

कॉलेज स्टुडंट असल्याने या सिरीजमध्ये कृतिका अतिशय साधी दाखवली आहे.

प्रेक्षकांना कृतिकाचा अभिनय अतिशय आवडल्यामुळेच तिचे फोटो सोशल मिडियावर व्हायरल होऊ लागले आहेत.

‘कितनी मोहब्बत है’ या टीव्ही मालिकेपासून कृतिकाने आपल्या अभिनयास सुरूवात केली.

या मालिकेमध्ये कृतिकाने आरोही नावाच्या मुलीचं व्यक्तित्त्व साकारलं होतं.

‘कितनी मोहब्बत है’ या व्यतिरिक्त कृतिका ‘कुछ तो लोग कहेंगे’, ‘प्रेम एक पहेली’ आणि ‘झलक दिखला जा’ या मालिंकामधूनही दिसली होती.

अली अब्बास जफर दिग्दर्शित या वेब सिरीजमध्ये सना (कृतिका) च्या भूमिकेची खुपच प्रशंसा केली जात आहे.

याशिवाय या वेब सिरीजमध्ये मोहम्मद जीशान अय्यूब, सुनील ग्रोवर, डिनो मोरिया, कुमुद मिश्रा, गौहर खान आणि संध्या मृदुल देखील आहेत.

राजनैतिक पार्श्वभूमीवर आधारित ही वेब सिरीज आहे.

ही वेब सिरीज १५ जानेवारीला अमेझॉन प्राइमवर प्रदर्शित झाली होती आणि प्रदर्शित झाल्याबरोबर ती जशी प्रंशसली गेली तशीच ती वादग्रस्तही ठरली आहे.