कृत्तिका कामराला अगदी सहज मिळाला होता पहिला जॉ...

कृत्तिका कामराला अगदी सहज मिळाला होता पहिला जॉब (Kritika Kamra Got Her First Break Like This, You Will Be Stunned To Know)

फार कमी लोकांच्या नशीबात अगदी सहज चांगल्या कामाच्या ऑफर्स मिळतात. त्या भाग्यवानांपैकी एक म्हणजे अभिनेत्री कृत्तिका कामरा. तिच्याकडे कामाची ऑफर स्वतःहून चालून आलेली.

कृत्तिका कामराने आपल्या करिअरची सुरुवात टीव्हीपासून केली होती, पण नंतर तिने चित्रपट आणि वेब सीरिजमध्ये काम करण्यास सुरुवात केली.  आत्तापर्यंत कृत्तिकाने अनेक मालिका, वेब शो आणि ‘मित्रों’ सारखा चित्रपट केला आहे. पण तिला मिळालेली पहिली जॉब ऑफर खूपच इंटरेस्टिंग होती.

उत्तर प्रदेशातील बरेली येथे जन्मलेली कृत्तिका कामरा मध्य प्रदेशात लहानाची मोठी झाली. तिने आपले सुरुवातीचे शिक्षण या दोन्ही शहरांतून केले आणि नंतर ती दिल्लीला शिफ्ट झाली. कृत्तिकाच्या पालकांबद्दल सांगायचे तर ते मेडिकल क्षेत्राशी जोडलेले आहेत. त्याची आई न्यूट्रिनिश्ट आहे, तर वडील डेंटिस्ट आहेत.त्यामुळे आपली मुलगी अभिनय क्षेत्रात करिअर करेल असे कृत्तिकाच्या पालकांना कधीच वाटले नव्हते.

कृत्तिका कामराने दिल्लीतील नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ फॅशन टेक्नॉलॉजीमध्ये फॅशनचा अभ्यास सुरू केला. तेव्हा तिला एका टीव्ही शोची ऑफर मिळाली.  त्यावेळेस ती फॅशन डिझायनिंगचा कोर्स करत होती, त्यानंतर तिने आपले शिक्षण मध्येच सोडले. कृत्तिकाला ‘यहाँ के हम सिकंदर’ची पहिली ऑफर मिळाली. या शोसाठी ती दिल्ली सोडून मुंबईत शिफ्ट झाली होती.

मात्र, कृत्तिकाला तिची खरी ओळख ‘कितनी मोहब्बतें है’ या मालिकेतून मिळाली. या शोमध्ये अभिनेत्रीने आरोही शर्माची भूमिका साकारली होती. याशिवाय ‘कुछ तो लोग कहेंगे’ या मालिकेतूनही तिने खूप नाव कमावले.

आता लवकरच कृत्तिका कामरा ‘हुश्श हुश्श’ या सिरीजमध्ये दिसणार आहे. या सिरीजमध्ये तिच्यासोबत करिश्मा तन्ना, जुही चावला आणि सोहा अली खान देखील महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहेत.

फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम