स्लिम बॉडीमुळे युजर्सने केली क्रिती सेननची निंद...

स्लिम बॉडीमुळे युजर्सने केली क्रिती सेननची निंदा (Kriti Sanon Gets Skinny-Shamed For Her Latest Work Out Video)

आजकाल बहुतांश कलाकार हे फिटनेस प्रिय असतात. त्यातीलच एक म्हणजे अभिनेत्री क्रिती सेनन. क्रितीच्या सौंदर्याचे आणि अभिनयाचे लाखो चाहते आहेत. क्रितीला मिमी या चित्रपटासाठी यंदाचा आयफा 2022 सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार मिळाला. नावापुढे सेलिब्रेटी ही पदवी आली की युजर्सकडून करण्यात येणारे ट्रोलिंगही आलेच. अभिनेत्री क्रिती सेनन ही देखील युजर्सच्या ट्रोलिंगची शिकार झाली आहे.

क्रितीने तिच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर तिचा वर्कआउट करतानाचा एक व्हिडिओ पोस्ट केला. ज्यामध्ये तिचा ट्रेनर तिला वर्कआउटमध्ये मदत करताना दिसत आहे. क्रितीचा हा व्हिडिओ वेगाने व्हायरल झाला. युजर्सनी या व्हिडिओला ट्रोल करण्यास सुरुवात केली आहे. तिची स्लिम बॉडी बघून युजर्स , आधीच एवढी बारीक आहेस चुकून हाड तुटेल, तर काहींनी जास्त व्यायाम केलास तर तुझे उरोज दिसेनासे होतील आधीच ते गायब आहेत अशी कमेंट करत आहेत.

तर क्रितीचे चाहते मात्र तिच्या मेहनतीचे आणि फिटनेसचे कौतुक करत आहेत. ट्रोलिंगवर क्रिती एकदा म्हणाली होती की प्रत्येक व्यक्ती काही ना काही गुण घेऊन जन्माला येते . मी अशीच आहे  आणि यापुढे ही अशीच राहणार. कोण काय म्हणेल याची मला पर्वा नाही. लोक वजन वाढले तरी ट्रोल करतात, नाही वाढले तरी ट्रोल करतात. त्वचेच्या रंगावरुन सुद्धा कमेंटमध्ये बोलतात. एखाद्याच्या शरीरावर बोलण्यापेक्षा त्याच्यातील गुण आणि कामावर लक्ष द्यावे. क्रितीच्या कामाबद्दल बोलायचे झाल्यास ती आदिपुरुष, गणपत, शहजादा आणि भेडिया या चित्रपटांमध्ये दिसणार आहे.