कियारा आणि सिद्धार्थ कपूरच्या लग्नाबाबत शाहिद क...

कियारा आणि सिद्धार्थ कपूरच्या लग्नाबाबत शाहिद कपूरने दिला संकेत, डिसेंबरमध्ये होऊ शकतं लग्न (Koffee With Karan 7: Shahid Kapoor Hints About Kiara Advani-Sidharth Malhotra’s Wedding, Karan Johar Says ‘Bacche Kamaal Ke Honge’)

कियारा अडवाणी आणि शाहिद कपूर करण जोहरच्या लोकप्रिय आणि वादग्रस्त चॅट शो ‘कॉफी विथ करण: सीझन 7’ च्या एका एपिसोडमध्ये पाहुणे म्हणून आले होते. तेव्हा करण जोहरने कियारा अडवाणीला तिच्या व सिद्धार्थच्या नात्याबद्दल काही प्रश्न विचारले. त्यावेळी या वर्षी कियारा आणि सिद्धार्थबाबतीत कधीही मोठी घोषणा होऊ शकते असा संकेत शाहिद कपूरने दिला.

या संदर्भातील प्रोमो सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. या प्रोमो  क्लिपमध्ये शाहिद असे ही म्हणतो की, या वर्षाअखेरीस कोणतीही मोठी घोषणा होऊ शकते त्यासाठी तयार रहा आणि हा कोणताही चित्रपट नाही. तसेच कियारा आणि सिद्धार्थची जोडी एकत्र खूपच सुंदर दिसते  असे सुद्धा शाहिदने सांगितले. शाहिदने असे म्हटल्यावर करणला सुद्धा बोलण्याची संधी मिळाली आणि तोही म्हणाला, यांची मुलं कमाल असतील….

जेव्हा करण जोहरने कियाराला तिच्या जवळच्या मित्राबद्दल विचारले तेव्हा अभिनेत्रीने शाहिदला तिचा जवळचा मित्र म्हटले. यावर हे सुरक्षित उत्तर आहे का, असा प्रश्न शाहिदने अभिनेत्रीला पुन्हा विचारला. यावर कियाराने ,  आपण सोफ्यावर बसलो आहोत असे उत्तर दिले.

क्लिपच्या पुढच्या भागात, करण जोहर कियाराला सिद्धार्थ मल्होत्रासोबतच्या तिच्या नात्याबद्दल प्रश्न विचारतो. तेव्हा कियारा त्यांचे नाते स्विकारत नाही पण त्याला नाही असे सुद्धा म्हणत नाही. पण शेवटी ती म्हणते की आम्ही जवळच्या मित्रांपेक्षा जास्त आहोत.

नंतर शाहिदने त्यांच्या जोडीचे कौतुक केले. कॉफी विथ करणच्या शेवटच्या एपिसोडमध्ये विकी कौशल आणि सिद्धार्थ मल्होत्रा ​​आले होते, त्या एपिसोडमध्ये सिद्धार्थने दबलेल्या आवाजात त्याच्या आणि कियारा अडवाणीच्या नात्याबद्दल खुलासा केला.