लग्नानंतर आलियाचा मधुचंद्राबद्दलचा भ्रमाचा भोपळ...

लग्नानंतर आलियाचा मधुचंद्राबद्दलचा भ्रमाचा भोपळा फुटला (Koffee With Karan 7 Promo: Alia Bhatt Busts Myth About Marriage, Says ‘There Is No Such Thing As ‘Suhagraat’)

करण जोहरचा प्रसिद्ध शो ‘कॉफी विथ करण’चा सातवा सीझन (सीझन 7) येत आहे. या शो चा प्रोमो काही दिवसांपूर्वी रिलीज करण्यात आला. या प्रोमोवरुन तरी या शो च्या पहिल्या भागात रॉकी और रानी की प्रेम कहानी या चित्रपटातील कलाकार  आलिया भट्ट आणि रणवीर सिंग उपस्थिती लावणार असल्याचे दिसते. या दोघांना करणने काही प्रश्न विचारले त्याची भन्नाट उत्तरे या दोघांनी दिली आहेत.

करणच्या शोमध्ये रणवीर आणि आलियाने खूप धमाल केल्याचे प्रोमोमध्ये पाहायला मिळते. दरम्यान करण आलियाला विचारतो की लग्नाबद्दलचा असा कोणता भ्रम जो लग्न झाल्यानंतर चुकीचा सिद्ध झाला. त्यावर आलिया लगेच म्हणते की लग्नाआधी आपण मधुचंद्राची रात्र वगैरे ऐकतो पण प्रत्यक्षात मात्र तो एक भ्रम आहे. कारण लग्नाच्या दिवशी आपण इतके थकलेले असतो की तशी रात्र कधी होतच नाही. आलियाच्या या उत्तरावर तिच्या शेजारी बसलेला रणवीर सुद्धा हसायला लागला. पण प्रोमोमध्ये आलियाचे हे उत्तर ऐकून तिचे चाहते, मग आलिया इतक्या लवकर गरोदर कशी झाली? अशी कमेंट करत आहेत.

यानंतर, करण आलियाला तिची ऑन-स्क्रीन केमिस्ट्री रणवीर सिंग की वरुण धवन यांपैकी कोणाशी चांगली आहे असा प्रश्न विचारतो. आलिया विचारात पडते पण त्यानंतर ती असे काही उत्तर देते ज्यामुळे रणवीर  रागात निघून जातो, पण नंतर करण त्याला समजावून परत आणतो. आणि आलियाला मजेत म्हणतो की तू एका मैत्रिणीच्या नावावर कलंक आहेस…

या शोमध्ये दोन्ही कलाकार त्यांच्या बेडरूम सीक्रेट्सबद्दल  मनमोकळेपणाने बोलताना दिसणार आहेत. रणवीर सिंगने त्याचे असे काही बेडरूम सीक्रेट सांगितले जे ऐकून  करणला धक्का बसला आणि एवढेच नाही तर रणवीरने त्याच्या सेक्स प्लेलिस्टबद्दलही सांगितले. या शोचा प्रोमो खूपच मजेशीर दाखवण्यात आला आहे त्यावरुन संपूर्ण शो सु्द्धा खूप मजेशीर असेल असे वाटते.  हा शो ७ जुलैपासून ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रसारित होईल . त्यात अनिल कपूर, क्रिती सेनन, शाहिद कपूर इत्यादी दिग्गज कलाकार हजेरी लावणार आहेत.