क्रिती सेननचे हे गुण ऐकल्यावर व्हाल अचंबित (Kno...

क्रिती सेननचे हे गुण ऐकल्यावर व्हाल अचंबित (Knowing This Hobby Of Kriti Sanon, You Will Press Your Finger Under Your Teeth)

 बॉलिवूडची सुंदर अभिनेत्री क्रिती सेननने चित्रपटसृष्टीत कोणत्याही गॉड फादरशिवाय आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. तिच्या अभिनय कौशल्याने चित्रपट समीक्षकांनाही आश्चर्यचकित केले आहे. क्रिती केवळ अभिनयातच पारंगत नाही तर तिच्यामध्ये आणखी एक विशेष गुण आहे. विशेष म्हणजे तो गुण क्रितीच्या  व्यक्तिमत्त्वाशी अजिबात जुळत नाही.

 क्रिती सेनन स्टायलिश असण्यासोबतच फिटनेस फ्रीकसुद्धा आहे. ती आपला फिटनेस राखण्यासाठी केवळ जिममध्ये घाम गाळत नाही तर आपल्या आवडत्या छंदातूनही ती स्वत:ला फिट ठेवते. खरं तर, खूप कमी लोकांना माहित असेल की क्रितीचा सर्वात आवडता छंद बॉक्सिंग आहे. क्रिती तिला वेळ मिळेल तेव्हा तो जोपासते. याशिवाय क्रितीला मोकळ्या वेळेत क्रिकेट बघणे, योगा करणे आणि जेवण बनवायला आवडते.

 सध्या बॉलिवूड कलाकार त्यांच्या अभिनयाव्यतिरिक्त व्यवसायातही पुढे आहेत. त्याचप्रमाणे बॉलिवूडची फिटेस्ट अभिनेत्री म्हणून ओळखल्या जाणाऱ्या क्रितीने आपल्या व्यवसायासाठी सुद्धा फिटनेसची निवड केली आहे. क्रितीने ‘द ट्राइब’ नावाच्या फिटनेस कम्युनिटीमध्ये गुंतवणूक केली आहे. क्रितीच्या या बिझनेसमध्ये अनुष्का नंदानी, करण साहनी आणि रॉबिन बहल हे पार्टनरस् आहेत. अभिनेत्रीने ही माहिती सोशल मीडियावर तिच्या चाहत्यांसोबत शेअर केली असून तिच्या चाहत्यांनी आणि बॉलिवूडच्या मित्रांनी तिचे खूप कौतुक केले होते.

पात्र साकारण्याची जिद्द काय असते याचे उदाहरण कृती सेननने दिले आहे. अत्यंत फिट असलेल्या क्रितीने आपल्या ‘मिमी’ चित्रपटासाठी 15 किलो वजन वाढवले होते. याबाबत अभिनेत्रीने सांगितले होते की, ‘भूक नसतानाही दर दोन तासांनी मला नाश्ता करावा लागयचा. कालांतराने जंक फूड पाहूनच मला नकोसे वाटायचे त्यावेळी मला योगासह कोणत्याही प्रकारचा व्यायाम करण्याचीही परवानगी नव्हती, त्यामुळे मला खूपच कसेतरी वाटायचे. पण माझ्या मेहनतीचे फळ मिळाले आणि चित्रपटाला चांगला प्रतिसाद मिळाला. महत्वाचे म्हणजे मिमी हा क्रितीच्या कारकिर्दीतील सर्वोत्कृष्ट चित्रपट मानला जात आहे.

क्रिती सेनन ही सध्या चित्रपटसृष्टीतील उत्कृष्ट अभिनेत्रींपैकी एक मानली जाते. तिने 2014 मध्ये टायगर श्रॉफसोबत ‘हिरोपंती’ या अॅक्शन चित्रपटाद्वारे बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. अनेक सुपरहिट चित्रपटांमध्ये क्रितीने आपल्या अभिनयाची जादू दाखवली आहे.  ‘राबता’, ‘दिलवाले’, ‘बरेली की बर्फ’, ‘हम दो हमारे दो’, ‘लुका छुपी’ आणि ‘मिमी’ यांसारख्या चित्रपटांमध्ये क्रितीने काम केले आहे..