‘माझ्या ब्रा ची फिटींग भगवान करतात’...

‘माझ्या ब्रा ची फिटींग भगवान करतात’- श्वेता तिवारीच्या या निवेदनावर झाली बोंबाबोंब (Know The Truth Of The Uproar Over Shweta Tiwari’s Controversial Statement)

श्वेता तिवारी ही छोट्या पडद्यावरील अतिशय लोकप्रिय आणि सतत चर्चेत असणारी अभिनेत्री आहे. कधी ती तिच्या प्रोजेक्ट्समुळे चर्चेत असते तर कधी खासगी आयुष्यामुळे. सध्या श्वेता तिने केलेल्या वक्तव्यामुळे चर्चेत आहे. श्वेताने माझ्या ब्रा ची फिटींग भगवान करत आहे, असे म्हटल्याने मोठा वाद रंगला आहे. या प्रकरणी मध्य प्रदेशच्या गृहमंत्र्यांनी चौकशीचे आदेश दिले असून २४ तासात अहवाल सादर करण्यास सांगितले आहे. पण ज्या व्हिडीओमुळे श्वेतावर टीका होत आहे त्या कार्यक्रमातील संपूर्ण व्हिडीओ आता समोर आला आहे.

श्वेता तिवारीची ‘शो स्टॉपर : मीट द ब्रा फिटर’ अशी आगामी वेब सीरिज येत आहे. त्याच संदर्भात भोपाळमध्ये एका कार्यक्रमात ती गेली होती. याच कार्यक्रमातील श्वेताचा “माझ्या ब्रा ची फिटींग भगवान करत आहे” असे बोलतानाचा एक छोटा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. आता या कार्यक्रमातील संपूर्ण व्हिडीओ समोर आला असून श्वेता असं का म्हणाली हे स्पष्ट झाले आहे.

श्वेता तिवारी अभिनीत या वेब सिरिजमध्ये तिच्या सोबत कंवलजीत, रोहित रॉय, सौरभ राज जैन, दिगांगना सूर्यवंशी इत्यादी कलाकारही आहेत. यातील सौरभ राज जैन हा सदर सिरिजमध्ये ब्रा फिटरची भूमिका निभावत आहे. ज्याने आतापर्यंत अनेक पौराणिक मालिकांमध्ये देवांच्या भूमिका केलेल्या आहेत. दर्शकांनी यापूर्वी त्याला कृष्ण – विष्णु अशा देवांच्या भुमिकेत पसंत केले आहे.

कार्यक्रमाचे सुत्रसंचालन करणाऱ्या सलील आचार्यने कलाकारांची मुलाखत घेताना सौरभला जेव्हा विचारले की, देवांच्या भूमिका करता करता तू एकदम ब्रा फिटरच्या भूमिकेत कसं काय आलास? त्यावेळेस मंचावर उपस्थित असलेल्या श्वेता तिवारीला हसू अनावर झाले व तिने मस्करीमध्ये म्हटलं की, माझ्या ब्राची फिटींग भगवान (देव) करत आहे… तिने हे विधान सौरभची सिरिजमध्ये जी भूमिका आहे, त्यास उदेद्शून केले होते. परंतु पाहणाऱ्यांनी तिच्या विधानाची सर्वत्र बोंबाबोंब केली. श्वेताने जेव्हा हे विधान केले त्यावेळेस तिला वाटलंही नव्हतं की त्याचा असा काही विपरीत परिणाम होईल. लोकांच्या भावना दुखावतील. तिने मस्करीत असे म्हटले होते. तिचा यामागे कोणताही हेतू नव्हता. ईटाइम्सने त्यांच्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाऊंटवर हा व्हिडीओ शेअर केला आहे. हा व्हिडिओ पाहिल्यानंतर आता श्वेताच्या वक्तव्यामागील कारण स्पष्ट झाले आहे.

फोटो सौजन्य – इन्स्टाग्राम