या कारणामुळे पंढरीनाथ कांबळेने सोडली महाराष्ट्र...

या कारणामुळे पंढरीनाथ कांबळेने सोडली महाराष्ट्राची हास्यजत्रा (Know The Reason Why Paddy Kamble Left The Show Maharashtrachi Hasy Jatra)

नुकताच फू बाई फू या शोचा 10 वा सीजन सुरु झाला आहे. एकेकाळी या शोने प्रेक्षकांना खळखळून हसवले होते. आता पुन्हा एकदा नव्याने हा शो सुरु झाल्यामुळे प्रेक्षक खुश आहेत. टीव्हीवर सतत सासू-सुनेची भांडणे, त्रिकोणी प्रेमप्रकरणे पाहून प्रेक्षक कंटाळतात. अशातच दिवसभराचा थकवा घालवण्यासाठी विनोदी शोकडे प्रेक्षकांचा कल जास्त असतो. त्यामुळेच सोनी मराठीवरील महाराष्ट्राची हास्यजत्रा ही मालिका तुफान गाजत आहे. या शोचा चाहतावर्ग खूप मोठा आहे.या शोमधील कलाकारसुद्धा चांगलेच नावारुपाला आले.

पण आता फू बाई फू सुरु झाल्यामुळे अचानक महाराष्ट्राची हास्यजत्रा या शोमधील काही कलाकारांनी तो शो सोडून फु बाई फुमध्ये काम करण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे या कलाकारांनी अचानक शो का सोडला असा प्रश्न प्रेक्षकांना पडला.

महाराष्ट्राची हास्यजत्रामध्ये काम करणाऱ्या ओंकार भोजने आणि पॅडी कांबळे या दोन कलाकारांनी शो सोडून फू बाई फूमध्ये काम करण्यास सुरुवात केली आहे.

याबाबत महाराष्ट्राची हास्यजत्रा या शोचे दिग्दर्शक सचिन गोस्वामी यांनी सांगितले की, ओंकार आमच्या शोची जान आहे. तो या शोमध्ये होता तेव्हा त्याला वेगवेगळ्या संधी मिळाल्या होत्या. अगदी हिंदी चित्रपटातही त्याला काम करण्याची संधी मिळाली होती. तो कुठेही गेला तरी हास्यजत्रामध्ये परत येईल असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.

पण पॅडी कांबळेने जेव्हा याबाबत सांगितले तेव्हा त्याच्या बोलण्यातून हास्यजत्रेबाबत नाराजी सूर दिसत होते. तो म्हणाला की, मला सतत एकाच प्रकारची भूमिका मिळत गेल्याने त्याच त्याच भूमिकेत मला लोकांनी पाहिले, म्हणून मी मधल्या काळात नाटकाकडे वळलो. त्यादरम्यान चित्रपटातही माझं काम चालू होतं. पण जेव्हा आपल्या वैयक्तिक कारणामुळे शो थांबवावा लागतो किंवा त्या शोला आपली गरज नाही. असे वाटायला लागते तेव्हा कोणीतरी ‘जा’ असं म्हणण्यापेक्षा आपण स्वतःहूनच शोमधून बाहेर पडलेलं बरं असतं.’

तो पुढे म्हणाला की, मी या शोमधून बाहेर पडल्यानंतर काही काळासाठी विश्रांती घेणार होतो मात्र फू बाई फूने मला आमंत्रण दिले आणि नवीन कलाकारांसोबत काहीतरी नवीन शिकायला मिळेल म्हणून ते आमंत्रण मी स्वीकारले. अर्थात पूर्वीचा शो सोडताना माझा कोणावरही राग नाही हे मी इथे स्पष्ट करतो. यापूर्वी देखील अनेक कलाकार अशाच समस्यांना सामोरे गेलेले पाहायला मिळालेले आहेत. पण ज्या कलाकाराच्या काम करण्याची जिद्द आणि स्वतःवर विश्वास आहे असे कलाकार हार मनात नाहीत उलट नव्या जोमाने मिळेल ती कामे करतात. त्यामुळे त्यांना पूर्वीपेक्षा देखील चांगली लोकप्रियता मिळते.