नोरा फतेहीने, अँडोर्समेंट आणि आयटम साँग्समधून क...

नोरा फतेहीने, अँडोर्समेंट आणि आयटम साँग्समधून कमावली ‘इतकी’ संपत्ती! (Know about actress Nora Fatehi Net Worth)

बॉलिवूडची सध्याची टॉप डान्सर आणि अभिनेत्री नोरा फतेही तिच्या आयटम साँग्ससाठी बरीच प्रसिद्ध आहे. तिची स्टाईल पाहताच चाहते मंत्रमुग्ध होतात. हार्डी संधूच्या ‘नाह’ या गाण्याद्वारे नोरा फतेहीने इंडस्ट्रीमध्ये पदार्पण केलं आणि जिंकलं. या गाण्यातील नोराच्या अदांनी चाहत्यांना अक्षरशः वेड लावलं. अभिनेत्रीचं पहिलंच गाणं इतकं हिट ठरल्यानंतर, टी-सीरिजच्या अनेक गाण्यांमध्ये ती दिसू लागली. नोराला बरेचदा सर्वोत्कृष्ट डान्सरचा पुरस्कारही मिळाला आहे. या सर्वांतून तिने आतापर्यंत प्रसिद्धीबरोबरच संपत्तीदेखील कमावली आहे

नोरा फतेही एका गाण्यात काम करण्यासाठी तब्बल ४० लाख रुपये घेते, अशी माहिती फिल्मसियाप्पा डॉट कॉमने दिली आहे. इतकेच नाही तर सोशल मीडियावर ब्रँडची जाहिरात करण्यासाठी नोरा ५ लाख रुपये मानधन आकारते. नोराचे ‘गर्मी’ हे गाणे सोशल मीडियावर सुपरहिट झाल्यानंतर तिने आपली फी देखील वाढवली होती.

नोराने बॉलिवूडमधील वरुण धवन, श्रद्धा कपूर, नेहा कक्कर आणि जॉन अब्राहमसह अनेक मोठ्या स्टार्सबरोबर काम केले आहे. लॉकडाऊन दरम्यान ती माधुरी दीक्षितच्या ‘डान्स दिवाने३’ या टेलिव्हिजनवरील शो मध्ये परीक्षक म्हणूनही दिसली.

नोरा आज बॉलिवूडची सर्वाधिक मानधन घेणारी अभिनेत्री बनली आहे. त्यामुळे ती सतत चर्चेत राहते आणि सतत काम करत असते. नोराची एकूण संपत्ती जवळपास दीड दशलक्ष डॉलर्स म्हणजेच रुपयांमध्ये पाहायला गेलो, तर ही रक्कम १२ कोटी इतकी आहे. नोरा दरवर्षी 2 कोटी रुपये कमवते. तिने नुकतेच एका चित्रपटाचे चित्रीकरणही केले आहे.

नोराने बॉलिवूडमध्ये तसेच कन्नड आणि तेलगू चित्रपटांमध्ये बरेच काम केले आहे. सुरुवातीला, तिला कामासाठी कठोर परिश्रम करावे लागले आहेत. परंतु, तिने कधीही हार मानली नाही. नोराच्या कुटुंबात तिचे आईवडील आणि एक भाऊ आहे. आपल्या धमाकेदार आयटम साँग्समुळे तिने बॉलिवूडमध्ये आपले स्थान निर्माण केले आहे. ज्यामुळे ती खूपच लोकप्रिय आहे.

Photo Courtesy: Instagram