सुनील शेट्टी यांची लेक अथिया शेट्टी आणि क्रिकेट...

सुनील शेट्टी यांची लेक अथिया शेट्टी आणि क्रिकेटर के.एल राहुल उद्या विवाहबद्ध होणार, सुनील शेट्टीच्या खंडाळा येथील फार्महाऊसमध्ये सजला लग्नमंडप (KL Rahul Athiya Shetty Wedding -Khandala House Decorated )

बॉलिवूड इंडस्ट्रीत पुन्हा एकदा सनई-चौघडे वाजत आहेत. अभिनेता सुनील शेट्टी यांची लेक अथिया शेट्टी आणि क्रिकेटर के.एल राहुल उद्या विवाहबद्ध होणार आहेत. कालच यांच्या मेहंदी, हळद यांसारख्या लग्नापूर्वीच्या सर्व समारंभांना सुरुवात झाली. सुनील शेट्टी यांच्या खंडाळा इथल्या फार्महाऊसमध्ये हे लग्न होणार आहे. त्यांच्या बंगल्याचे आणि बंगल्याला केलेल्या डेकोरेशनचे फोटो सुद्धा सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. अशातच आपल्या लग्नाबद्दल अथिया आणि राहुल यांनी एक मोठा निर्णय घेतला आहे.

हा लग्नसोहळा अगदी खाजगी पद्धतीने होणार आहे. या लग्नात अथिया आणि राहुल यांचे नातेवाईक आणि मित्रपरिवार असे फक्त शंभरच जण उपस्थित राहणार असल्याचं समजतंय. तर इतर काही सेलिब्रिटींप्रमाणेच अथिया आणि केएल राहुलनेही पाहुण्यांना ‘नो फोन’ पॉलिसीचं पालन करण्याची विनंती केली आहे. जेणेकरून लग्नाचे फोटो सोशल मीडियावर लीक होणार नाहीत. या लग्नाला जॅकी श्रॉफ, सलमान खान, अक्षय कुमार, एम. एस. धोनी, विराट कोहली हे सेलिब्रिटी हजेरी लावणार असल्याचं कळतंय. खंडाळ्याच्या फार्महाऊसचे फोटो –

२०१९ मध्ये एका कॉमन फ्रेंडच्या माध्यमातून या दोघांची भेट झाली. पहिल्या भेटीतच दोघांची चांगली मैत्री झाली होती. त्यानंतर २०२१ मध्ये अथियाच्या वाढदिवशी केएल राहुलने तिच्यासोबतचा फोटो पोस्ट करत रिलेशनशिप जाहीर केलं होतं. अथिया आणि राहुल गेले अनेक महिने एकमेकांना डेट करत होते. अखेर उद्या म्हणजे २३ जानेवारी रोजी ते बोहल्यावर चढणार आहेत.

अथियाने २०१५ मध्ये ‘हिरो’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. त्यानंतर ती मुबारकां (२०१७) आणि मोतीचूर चकनाचूर (२०१९) या दोन चित्रपटांमध्येच झळकली आहे. अथिया लवकरच फुटबॉलपटू अफशान आशिकचा बायोपिक ‘होप सोलो’मध्ये मुख्य भूमिकेत दिसणार असल्याचं वृत्त आहे.

सध्या दोघांच्या लग्नाची सर्वत्र चर्चा आहे.