लवकरच अथिया शेट्टी आणि केएल राहुल करणार दाक्षिण...

लवकरच अथिया शेट्टी आणि केएल राहुल करणार दाक्षिणात्य पद्धतीने लग्न (KL Rahul and Athiya Shetty’s wedding dates out, Love birds will tie the knot as per traditional South Indian wedding on this day)

सुनील शेट्टीची मुलगी अभिनेत्री अथिया शेट्टी आपल्या वैयक्तिक आयुष्यामुळे बऱ्याच दिवसांपासून चर्चेत आहे. ती क्रिकेटर केएल राहुलला डेट करत आहे. त्यांच्या लग्नाच्या बातम्याही बऱ्याच दिवसांपासून चर्चेत होत्या. आता त्यांच्या लग्नाशी संबंधित नवीन माहिती समोर आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार दोघेही जानेवारीत लग्न करणार आहेत.


अथिया शेट्टी आणि केएल राहुल अनेक वर्षांपासून एकमेकांना डेट करत आहेत. दोघेही अनेकदा एकत्र स्पॉट होतात. सोशल मीडियावरही दोघे एकमेकांवर उघडपणे प्रेमाचा वर्षाव करतात. दोघांच्या लग्नाबाबत अनेकदा चर्चा होत असते. पण अजूनही सुनील शेट्टी अथियाच्या लग्नाबाबत विचारले असता लवकरच ‘लवकरच’ म्हणत इतर गोष्टी टाळतात.

काही दिवसांपूर्वी दोघेही जानेवारीत लग्नबंधनात अडकणार असल्याची बातमीही आली होती, मात्र आतापर्यंत दोघांकडून लग्नाच्या तारखेबाबत कोणतेही स्पष्टीकरण आलेली नाही. पण आता प्री-वेडिंग फंक्शनपासून लग्नापर्यंतच्या तारखा समोर आल्या आहेत.


एका एंटरटेनमेंट पोर्टलने केएल राहुल आणि अथिया शेट्टीच्या लग्नाच्या तारखा उघड केल्या आहेत. त्यांच्या रिपोर्टनुसार, अथिया आणि राहुलच्या लग्नाचे विधी 21 ते 23 जानेवारी 2023 दरम्यान होणार आहेत. या भव्य लग्नात कुटुंबातील सदस्य आणि जवळचे मित्र सहभागी होणार आहेत. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, लग्नाला अवघे काही दिवस शिल्लक असल्याने दोन्ही कुटुंबीय लग्नाच्या तयारीत व्यस्त आहेत.


केएल राहुलच्या जवळच्या सूत्राकडून मिळालेल्या माहितीनुसार, डिसेंबरच्या शेवटी लग्नाची आमंत्रणे पाठवली जातील. दोघांचे लग्न दक्षिण भारतीय रितीरिवाजानुसार होणार आहे. 21 तारखेपासून सुरू होणाऱ्या प्री-वेडिंग फंक्शन्समध्ये हळद, मेहंदी आणि संगीताचे सर्व विधी थाटामाटात साजरे केले जाणार आहेत. याबाबतची अधिकृत घोषणा अद्याप झाली नसली तरी दोन्ही घरात लग्नाची तयारी जोरात सुरू झाली आहे.


केएल राहुल आणि अथिया शेट्टीच्या लग्नानंतर एक भव्य रिसेप्शन आयोजित केले जाईल, ज्यामध्ये बॉलिवूड आणि क्रीडा विश्वाशी संबंधित सर्व सेलिब्रिटींचा समावेश असेल. केएल राहुलनेही बीसीसीआयकडून लग्नासाठी सुट्टी घेतली आहे.