जाणून घ्या केएल राहुल आणि अथिया शेट्टीची एकूण स...

जाणून घ्या केएल राहुल आणि अथिया शेट्टीची एकूण संपत्ती(KL Rahul and Athiya Shetty Are Owners of Property Worth Crores, You Will be Surprised to Know Their Net Worth)

बॉलिवूड अभिनेता सुनील शेट्टीची लाडकी मुलगी अथिया शेट्टीने तिचा दीर्घकालीन प्रियकर आणि भारतीय संघाचा क्रिकेटर केएल राहुलसोबत लग्न केले आहे. खंडाळा बंगल्यात या जोडप्याने सप्तपदी घेतल्या. दोघेही जवळपास 4 वर्षांपासून एकमेकांना डेट करत होते. परंतु तुम्हाला माहिती आहे का की दोघांची संपत्ती किती आहे. नसेल तर चला जाणून घेऊया.

अथिया शेट्टी काही चित्रपटांमध्ये दिसली होती मात्र ती प्रेक्षकांच्या मनावर विशेष जादू करू शकली नाही. पण जरी तिने चित्रपटांमध्ये विशेष कामगिरी दाखवली नसली तरीही ती भरपूर कमाई करते. अथियाने सूरज पांचोलीसोबत ‘हिरो’ या चित्रपटातून आपल्या अभिनय कारकिर्दीला सुरुवात केली होती. हा चित्रपट पडद्यावर चालला नसला तरी चाहत्यांमध्ये अथियाला नक्कीच ओळख मिळाली.

अथियाच्या एकूण संपत्तीबद्दल बोलायचे झाल्यास 2022 पर्यंत तिच्याकडे जवळपास 28 कोटींची संपत्ती होती. ती बर्‍याच ब्रँड्ससाठी काम करते, त्याद्वारे अभिनेत्री खूप पैसे कमावते. एका जाहिरातीसाठी अथिया 30 ते 50 लाख रुपये घेते, असे म्हटले जाते.

केएल राहुलबद्दल बोलायचे झाल्यास, तो भारतीय क्रिकेट संघाचा एक यशस्वी क्रिकेटर आहे. तो भारतीय संघाचा उपकर्णधारही आहे. 2022 च्या आकडेवारीनुसार, केएल राहुलकडे एकूण 75 कोटींची संपत्ती आहे. त्यानुसार लग्नानंतर दोघांची एकूण संपत्ती 100 कोटींहून अधिक असेल.

दोघांच्या प्रेमकथेबद्दल बोलायचे झाले तर अथिया शेट्टी आणि केएल राहुल 2019 मध्ये पहिल्यांदा भेटले होते. दोघेही एका कॉमन फ्रेंडच्या माध्यमातून पहिल्यांदा भेटले होते, त्यानंतर त्यांची मैत्री झाली आणि या मैत्रीचे रुपांतर हळूहळू प्रेमात झाले.

विशेष म्हणजे रिलेशनशिपमध्ये आल्यानंतरही दोघांनी कधीही मीडियासमोर आपलं प्रेम स्वीकारलं नाही, पण जेव्हा अथिया आणि राहुलने इंस्टाग्रामवर एकमेकांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या तेव्हा त्यांच्या नात्याबद्दलच्या अफवा आणखीनच वाढल्या. जवळपास 4 वर्षांच्या डेटिंगनंतर आता दोघेही नव्या आयुष्याला सुरुवात करणार आहेत.