खतरों के खिलाडीच्या टंच स्पर्धकांनी मोनोकिनीमध्...

खतरों के खिलाडीच्या टंच स्पर्धकांनी मोनोकिनीमध्ये परदेशी वातावरण तापवले; पण एकीने देशी पेहरावात लोकांना जिंकले (KKK 11 Contestants Shares Bold Monokini Pics, But Divyanka Tripathi Shows Her Desi Girl Style)

‘खतरों के खिलाडी’ या कार्यक्रमाच्या ११ व्या सीझनसाठी काही टंच कलावती केपटाऊनला (दक्षिण आफ्रिकेतील महत्त्वाचे शहर) गेल्या आहेत. तिथे धीटाईने आपल्या सेक्सी अदा दाखवत, त्या शहराचे जणू तापमान वाढवत आहेत. त्यांचे नखरे पाहून तुम्हीही हैराण व्हाल. अलिकडेच आपला भाऊ गेला असल्याच्या सुतकात असलेली निक्की तांबोळी पण त्या स्पर्धक तरुणींमध्ये आहे. केपटाऊनमध्ये आपल्या दिलखेचक आविर्भावाने तेथील लोकांना वेड लावत आहे.

फोटो सौजन्य : इन्स्टाग्राम

निक्की तांबोळीची ही बोल्ड छायाचित्रे पाहून लोक खूपच कमेंटस्‌ देत आहेत. यापूर्वी बिग बॉसच्या १४ व्या सीझनमध्ये असेच नखरे दाखवून निक्की चर्चेत राहिली होती.

फोटो सौजन्य : इन्स्टाग्राम

धीटपणा दाखवण्यात, गायिका आस्था गिल काही कमी नाही. आस्थाने सोशल अकाऊंटवर आपली बिकिनीतली छायाचित्रे टाकली. ते बघून लोक तिच्यावर लुब्ध झाले आहेत.

फोटो सौजन्य : इन्स्टाग्राम

मॉडेल आणि अभिनेत्री सना मकबूल देखील आपल्या दिलखेचक छायाचित्रांनी लोकांना वेड लावत आहे. केपटाऊनमध्ये आपली रेखीव देहयष्टी दाखविताना ती जराही कचरली नाही. सनाने आपले बोल्ड फोटो आपल्या सोशल अकाऊंटवर शेअर केले आहेत.

फोटो सौजन्य : इन्स्टाग्राम

बिकिनी, मोनोकिनी घालून या काही कलावतींनी कहर केला असला तरी टी.व्ही. ची प्रसिद्ध अभिनेत्री दिव्यांका त्रिपाठीने त्यांच्या विरुद्ध कृती केली. तिने आपली साधी, देशी पेहरावातील छायाचित्रे टाकून त्या मदाक फोटोंची नशा कमी केली. साडी नेसून सोज्वळतेचे प्रदर्शन करणारी दिव्यांकाची ही छायाचित्रे पाहा –

फोटो सौजन्य : इन्स्टाग्राम

साडीच्या साध्या अवतारात दिव्यांका फारच सुंदर दिसते आहे. ‘खतरों के खिलाडी’ कार्यक्रमात भाग घ्यायला दिव्यांका पण केपटाऊनमध्ये दाखल झाली आहे. परदेशात तिचे हे सोज्वळ रुप पाहून लोक तिच्यावर लुब्ध झाले आहेत.

दक्षिण अफ्रिकेतील केपटाऊन या प्रमुख शहरामध्ये ‘खतरों के खिलाडी सीझन ११’ ची सुरुवात होत आहे. त्याच्या चित्रणासाठी हे सर्व कलाकार तिथे पोहोचले आहेत. शूटिंगच्या निमित्ताने पोहचलेली ही सर्व तरुणाई तिथे कामाबरोबरच मौजमस्तीमध्ये वेळ घालवत आहेत.